Superfood
Superfood 
happening-news-india

सर्च-रिसर्च -  शतायुषींच्या देशातील ‘सुपरफूड’

महेश बर्दापूरकर

जपानमधील शतायुषींबद्दल आपण या सदरात वाचले आहे. जपानमधील लोकांची खाद्यसंस्कृती त्यांना शतायुषी होण्यात मदत करते. यामध्ये महत्त्वाचा पदार्थ आहे ‘नाटो’. त्याला ‘सुपरफूड’ म्हणून मान्यता मिळाली आहे. आंबवलेल्या सोयाबीनपासून बनवलेला हा पदार्थ रोज खाल्ल्यास आयुष्यमान वाढते, हे संशोधकांना गेल्या काही शतकांपासून ज्ञात आहे. मात्र हा पदार्थ अत्यंत चिकट असून, त्याला अमोनियासारखा वास येत असल्याने जुन्या पिढीतील लोकांबरोबरच नवी पिढीही तो फारसा पसंत करीत नसल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जपानमधील जुन्या पिढीतील लोकांच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून ‘नाटो’कडे पाहिले जाते. २०१७मधील एका सर्वेक्षणानुसार हा पदार्थ  ६२ टक्के लोकांना खायला आवडतो, तर तेरा टक्के लोकांना तो अजिबात आवडत नाही. हे ‘सुपरफूड’ शरीरातील रक्तप्रवाह सुधारते आणि मेंदूतील रक्तस्त्रावाची भीती कमी करते, असे मानले जाते. जपानमधील ‘सोरा न्यूज -२४’ या वृत्तवाहिनीने ‘अ पॅक ऑफ नाटो अ डे किप्स द डेथ अवे’ अशी घोषणाच केली आहे. थोकू विद्यापीठातील संशोधक हितोशिनी शिराकावा त्याला दुजोराही देतात. ‘‘सोयाबीन आंबवून बनवलेल्या पदार्थांतील पोषणमूल्ये त्यांवरील प्रक्रियेदरम्यान नष्ट होत नाहीत. त्यामुळेच या पदार्थाचे सेवन व हृदयविकाराचे कमी होणारे प्रमाण यांचा परस्परसंबंध आहे. तसेच, या पदार्थात मोठ्या प्रमाणावर प्रथिने, लोह, तंतूमय पदार्थ असल्याने रक्तदाब व वजन कमी होण्यास मदत होते. ‘नाटो’ खाण्याने लोकांना तरुण झाल्याचे जाणवते. ‘नाटो’च्या ४० ते ५० ग्रॅमच्या एका डिशमध्ये विपुल प्रमाणात ‘व्हिटॅमिन के’ असते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांच्या आजारापासून मुक्तता होते. ‘नाटो’मध्ये व्हिटॅमिन ‘बी ६’ व व्हिटॅमिन ‘इ’ मोठ्या प्रमाणात असते व त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडणे बंद होते,’’ असे शिराकावा सांगतात.  

खरेतर, आंबवलेल्या सोयाबीनचे फायदे लक्षात येण्याआधीपासूनच ते जपानी डाएटचा भाग होते. हे पदार्थ चीनमार्गे नारा कालावधीत (ख्रिस्तपूर्व ७१० ते ७८४) जपानमध्ये आले. ‘नाटो’ १६०३ ते १८६७ दरम्यान पाककृतींवरील पुस्तकांत व प्रत्येक घरात दिसू लागला. ‘‘नाटो बनविण्यासाठी सोयाबीन पाण्यात भिजवून ठेवतात. त्यानंतर ते उकडले व वाफवले जातात व एक दिवस आंबवले जातात. ‘नाटो’ आता सुपरमार्केटमध्ये १०० ते ३०० येनला (१ ते ३ पौंड) मिळते. या पदार्थाच्या पॅकमध्ये सोया सॉस व मोहरीची तिखट चटणीही असते. घरात हे तीन पदार्थ एकत्र करून बनलेला चिकट पदार्थ शिजवलेल्या भातावर टाकला जातो. त्यावर अंडी व कांद्याची पात घातली जाते. अनेक रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवून व नावाने विकला जातो,’’ अशी माहिती शिराकावा देतात. ‘सुपरफूड’ असूनही ‘नाटो’ हा पदार्थ जपानबाहेर मात्र फारसा खाल्ला जात नाही.

त्याचा समावेश स्वीडनमधील तिरस्करणीय (डिस्गस्टिंग फूड) पदार्थांच्या संग्रहालयातील यादीत करण्यात आला आहे. संग्रहालयाचे संचालक अँड्रेस अर्हेन्स यांच्या मते, या पदार्थाचा चिकटपणा लोकांना त्रासदायक वाटतो. घाणीत सापडणारे जिवाणू त्यात आढळत असल्याने किळसवाणा वासही येतो. मात्र, या पदार्थाला सांस्कृतिक परंपराही आहे. तुम्ही कोणत्या वातावरणात वाढलात आणि तुमच्या आवडी-निवडी कशा तयार झाल्या यावर खाद्यसंस्कृती अवलंबून असते. ‘नाटो’ हे त्याचे चांगले उदाहरण आहे. जपानमध्ये प्रवास करून आलेल्या अनेकांनी हा पदार्थ खाल्ला असून, अनेकांना तो आवडला, तर काहींना अजिबात आवडला नाही. मात्र, जगभरात ‘नाटो’सारखे आंबवलेले पदार्थ खाण्याची आवड निर्माण होत आहे आणि भविष्यात शंभरी गाठण्यास मदत करणारा हा पदार्थ देशोदेशींच्या स्वयंपाकघरात बनवला जाईल असे वाटते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT