sd phadnis cartoons sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : पुणेरी फडणीसांमधला ‘व’..!

धडाडीचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार राजसाहेब ठाकरे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेही बरंच हसले!! म्हंजे नेहमीपेक्षा बरंच हसले. प्रदर्शनात एक शिदंचं व्यंगचित्र होतं.

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! व्यंगचित्रकाराच्या नजरेतून पाऊणशे वर्षे सारे विश्व बघणं हा काही विनोद नव्हे. पण शंभरीच्या उंबरठ्यावर खमकेपणाने उभ्या असलेल्या आमच्या शिवराम दत्तात्रय फडणीसांनी हा पराक्रम केला आहे. शिदंच्या हसऱ्या गॅलरीचं प्रदर्शन गेली तीन-चार दिवस पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात भरलं होतं. २९ जुलै हा शिदंचा नव्व्याण्णवावा वाढदिवस.

त्या निमित्तानं कार्टुनिस्ट कंबाईन आणि वसुंधरा क्लब यांनी संयुक्तपणे ‘शिदं’ १००’ हा कार्यक्रम-कम-प्रदर्शन आयोजित केलं होतं. पुणेकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. -म्हंजे पुणेकर बालगंधर्वला आले. ‘शिदं’च्या हसऱ्या गॅलरीत हिंडले, ही व्यंगचित्रं आहेत, हे आधीच माहीत असल्यानं थोडेफार हसलेदेखील!!

धडाडीचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार राजसाहेब ठाकरे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेही बरंच हसले!! म्हंजे नेहमीपेक्षा बरंच हसले. प्रदर्शनात एक शिदंचं व्यंगचित्र होतं. अर्थात नेहमीप्रमाणे शब्दविरहित. एक मांजर आपल्या पिलांना दुदू पाजतेय, आणि त्या पिलावळीत उंदिरही चान्स मारतोय!! हे चित्र बघून व्यंगचित्रकार ठाकरे म्हणाले : बघा, महाराष्ट्राची अवस्था अशीच झाली आहे.

‘शिदंच्या फडणीस या आडनावात ‘व’ असता तर ते व्यंगचित्र झाले असते, ‘व’ आपल्या वाटेनं निघून गेल्यानं ते व्यंगचित्रकार झाले,’ असं व्यं. चि. का. ठाकरे म्हणाले तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शिदंचा जन्म बेळगावजवळच्या भोज गावातला. मग शिक्षणासाठी ते कोल्हापुरात आले.

तिथं महाद्वार रोड, रंकाळा अशा आंतरराष्ट्रीय ठिकाणी शिदं आणि वसंत सरवटेनामक एक होतकरु चित्रकार रेखाटनं करायला जात असत. पुढे सरवटे पुण्यात विद्या शिकून अभियंता झाले, शिदंनी जे जे स्कूल ऑफ आर्ट गाठलं. दोघांनी पुढे आपापली विद्या टाकून व्यंगचित्रकाराचा व्यवसाय पत्करला हे विशेष.

शिदंची व्यंगचित्रं शब्दविरहित असतात. त्यांची चित्रशैली पाऊणशे वर्ष महाराष्ट्र पाहातो आहे. ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकावर शिदंचं व्यंगचित्र असणार म्हणजे असणारच, असं समीकरणच होतं. वसंतराव सरवटे वर्षानुवर्षं ‘ललित’ दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ करायचे. हे दोन्ही नावाजलेले व्यंगचित्रकार ‘विवेक’ नं तयार केलेल्या सात-आठशे पानी ‘चित्रशिल्प कोशा’त आवर्जून समाविष्ट केले गेले.

हा कोश ज्यांनी संपादित केला, त्या चित्रकार सुहास बहुलकरांनीच परवा शतायुषी शिदंच्या हसऱ्या गॅलरीचं उद्घाटन केलं. शिदं पुण्याचे असल्याने त्यांनी व्यंगचित्रकारांच्या स्वामित्त्व-हक्कासाठी जोरकस लढा दिला. तेवढ्यासाठी कॉपीराइट कायद्याचा अभ्यास त्यांनी केला. तो इतका केला की काही वकीलमंडळी त्यांचा सल्ला घेण्यासाठी शुक्रवार पेठेतल्या सुभाष नगरात चकरा मारु लागले, असे ऐकिवात आहे.

किर्लोस्करनं तेव्हा ‘हसाल का?’ नावाचं एक व्यंगचित्रांचं संकलन प्रसिद्ध केलं होतं. तेव्हाही पुनर्प्रसिद्धीच्या आधीही संबंधित व्यंगचित्रकाराची अनुमती अनिवार्य असल्याची आग्रही भूमिका शिदंनी मांडली होती. एकंदरित गृहस्थ पुणेरी!! पण त्यांच्या पुणेरीपणामुळेच आज नव्या पिढीतल्या व्यंगचित्रकारांना मोकळा श्वास घेता येतोय, हे विसरता येणार नाही.

हसऱ्या गॅलरीच्या उद्घाटनाला मी धावत पळत गेले. दोन जिने टणाटणा चढून ताठ कण्याने हातात ध्वनिक्षेपक घेऊन खणखणीत बोलणारे शिदं बघितले आणि मला बै न्यूनगंडच आला. तेच दोन जिने चढताना माझी मेली किती दमछाक झाली!! हसऱ्या गॅलरीचं उद्घाटन झालं तेव्हा टाळ्या वाजवत सगळे गॅलरीत उभे राहून हसत होते. अपवाद सुधीर गाडगीळांचा. त्यांना शिदंची मुलाखत घ्यायची होती. पण शिदंनी शब्दविरहित प्रतिसाद दिल्याने ते माफकच हसले असावेत. असो.

आडनावात ‘व’ नसल्याने शिदंचं व्यंगचित्र निघालं नाही, या चाहत्याच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी सोबत तसं व्यंगचित्र देत आहो! हॅप्पी हंड्रेड, शिदं!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT