कोल्हापूरमधील कुरुंदवाड येथे जन्मलेल्या या मराठमोळ्या शास्त्रज्ञाला खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित शॉ पुरस्कार जाहीर झाला आहे.  Sakal
संपादकीय

खगोलशास्त्रातील मनस्वी संशोधक

कोल्हापूरमधील कुरुंदवाड येथे जन्मलेल्या या मराठमोळ्या शास्त्रज्ञाला खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित शॉ पुरस्कार जाहीर झाला आहे.

मंजूषा कुलकर्णी

‘एखाद्या क्षेत्राचा बोलबाला होण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणे आणि ते लोकप्रिय झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणे, ही माझी कामाची पद्धत आहे,’ असा विचार भारतीय वंशाचे खगोल भौतिकशास्त्रज्ञ श्रीनिवास रा. कुलकर्णी यांनी त्यांच्या परिचयपत्रकात व्यक्त केला आहे. घरात वैद्यकशास्त्राचा वारसा असलेले कुलकर्णी भौतिकशास्त्राकडे वळले.

कोल्हापूरमधील कुरुंदवाड येथे जन्मलेल्या या मराठमोळ्या शास्त्रज्ञाला खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित शॉ पुरस्कार जाहीर झाला आहे. मिलिसेकंद पल्सर, गॅमा-रे स्फोट, सुपरनोव्हा आणि इतर परिवर्तनीय किंवा क्षणिक खगोलीय वस्तूंबद्दलच्या महत्त्वपूर्ण शोधांसाठी पुरस्कार समितीने त्यांची निवड केली आहे.

श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी यांचा जन्म चार ऑक्टोबर १९५६ रोजी कुरुंदवाडमध्ये झाला. त्यांचे वडील डॉ. रामचंद्र कुलकर्णी हे हुबळी येथे सर्जन होते. प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती या त्यांच्या भगिनी आहेत.

कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण हुबळीत झाले. त्यांनी १९७८ मध्ये दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून उपयोजित भौतिकशास्त्रात एम.एस. केले आहे. बंगळूर येथे खगोलशास्त्र या विषयावरील व्याख्याने ऐकून त्यांना खगोलशास्त्रात रस निर्माण झाला.

१९८३ मध्ये अमेरिकेत बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएच.डी. मिळविल्यानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) या संस्थेत प्राध्यापक झाले. ‘इंटरस्टेलर मेडियम पल्सार’, ‘ब्राऊन ड्वार्फ’ (बटू तारे), ‘सॉफ्ट गॅमा रे रिपीटर्स’, ‘गॅमा किरणांचे स्फोट’, ‘ऑप्टिकल ट्रान्झियंट्स’ हे त्यांचे संशोधनाचे विषय होते.

कुलकर्णी यांनी रेडिओ खगोलशास्त्रज्ञ म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. स्पंदनशील ताऱ्यांसंबंधीच्या त्यांच्या शोधामुळे शास्त्रज्ञांना ताऱ्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. अत्यंत उच्च तापमान आणि घनतेवर पदार्थाचे वर्तन, विश्वाचा आकार व वय, मूलभूत भौतिकशास्त्राचे पैलू इत्यादींवरही प्रकाश टाकला आहे.

अवकाशाबद्दलच्या त्यांच्या अभ्यासाने खगोलशास्त्रात नवी क्रांती केली आहे, असे शॉ पुरस्कार फाउंडेशनने म्हटले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कुलकर्णी यांनी डोनाल्ड बॅकर आणि सहकाऱ्यांसमवेत ‘पीएसआर बी१९३७+२१’ या पहिल्या मिलिसेकंद पल्सरचा शोध लावला होता.

लंडनच्या रॉयल सोसायटीच्या निवडक भारतीय फेलोंपैकी एक कुलकर्णी आहेत. २००१ मध्ये ते या संस्थेचे फेलो झाले. २००३ मध्ये ते ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’चे सदस्य झाले. सध्या ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ‘स्पेस इन्फरनोमेट्री मिशन''चे सदस्य असून पालोमार आणि केक येथील प्रकाशीय वेधशाळांचे संचालक आहेत.

रेडिओ लहरींवर काम करणारे खगोल भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी सुरुवातीला ग्लोब्युलर क्लस्टर पल्सरच्या (स्पंदक तारा) शोधात काम केले होते. मार्गदर्शक कार्ल हेल्स यांच्याबरोबर काम करताना श्रीनिवास कुलकर्णी यांनी आकाशगंगेचा अभ्यास केला. हेल्स यांच्यासह सहयोगी लेखक म्हणून त्यांनी लिहिलेल्या समीक्षा लेखांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

‘नेचर’ या विज्ञानविषयक नियतकालिकातील ६३ लेख व ‘सायन्स लेटर्स’मधील सात लेखांतून खगोलशास्त्रातील त्यांच्या संशोधनाची व्याप्ती समजते. याशिवाय, २०१५ पर्यंतच्या ४७९ वैज्ञानिक संदर्भलेखात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. खगोल व भौतिकशास्त्रातील कार्यासाठी कुलकर्णी यांना १९९२ मध्ये ॲलन टी. वॉटरमन पुरस्कार,

अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीकडून १९९१ मध्ये हेलन बी. वॉर्नर पुरस्कार, २००२ मधील जान्स्की पुरस्कार, ‘इन्फोसिस’ आणि तेल अविव्ह विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाउंडेशननेही त्यांचा गौरव केला आहे. यंदा जाहीर झालेल्या ‘शॉ पुरस्कारा’चे वितरण १२ नोव्हेंबर रोजी हाँगकाँग येथे होणार आहे. या पुरस्काराने सन्मानित शास्त्रज्ञांना बारा लाख डॉलर एवढी रक्कम दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT