Women Sakal
संपादकीय

विश्‍लेषण : स्त्रीमुक्तीचा मुद्दा धर्मवादाच्या वेठीला

स्त्रीमुक्तीच्या किंवा व्यक्तिस्वातंत्र्याच्या कोणत्याही मुद्द्याचा धर्मवादी राजकारणाच्या वेदीवर बळी दिला जातोय. धर्मवादी राजकारणाच्या पकडीत व्यक्तिस्वातंत्र्याची कोंडी केली जात आहे.

मिलिंद मुरुगकर

स्त्रीमुक्तीच्या किंवा व्यक्तिस्वातंत्र्याच्या कोणत्याही मुद्द्याचा धर्मवादी राजकारणाच्या वेदीवर बळी दिला जातोय. धर्मवादी राजकारणाच्या पकडीत व्यक्तिस्वातंत्र्याची कोंडी केली जात आहे.

स्त्रीमुक्तीच्या किंवा व्यक्तिस्वातंत्र्याच्या कोणत्याही मुद्द्याचा धर्मवादी राजकारणाच्या वेदीवर बळी दिला जातोय. धर्मवादी राजकारणाच्या पकडीत व्यक्तिस्वातंत्र्याची कोंडी केली जात आहे.

राजकारणात जेव्हा धर्मांधता आणि धर्मद्वेष प्रभावी असतो,तेव्हा स्त्रीमुक्तीच्या प्रश्नांची कशी वासलात लावली जाते, याचे ताजे उदाहरण म्हणजे श्रद्धा वालकर खून प्रकरण. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात या प्रश्‍नावर मूक मोर्चा काढण्याचे हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या एका संघटनेने जाहीर केले आहे. त्याविषयीच्या प्रसिद्धी फलकामध्ये म्हटले आहे की, श्रद्धा वालकर या हिंदू भगिनीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हेगार आफताबला फाशी देण्यात यावी. याच प्रसिद्धी फलकात ‘लव्ह जिहाद’विरूद्ध कायदा करावा आणि गोहत्याबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही म्हटले आहे.

या मोर्चाचा श्रद्धा वालकर या व्यक्तीवर किंवा तिच्या आप्तेष्टांवर झालेल्या अन्यायाशी खरंच काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण असे की, यात श्रद्धा वालकर यांचा उल्लेख ‘हिंदू भगिनी’ असा करण्यात आला आहे. आजवर या देशात अनेक स्त्रियांचा असा खून झालेला आहे. आणि बहुतांश वेळी हा खून त्यांच्या नवऱ्यांनी किंवा अगदी जवळच्या नातेवाईकांनी केलेला आहे आणि ते बहुसंख्याक समाजातील होते.

अशा वेळेला अशा संघटनांनी आमच्या हिंदू भगिनींवर अत्याचार झाला म्हणून मोर्चा काढलेला नाही. त्यावेळेस बहुधा अत्याचारी स्त्री त्यांना त्यांची भगिनी वाटलेली नव्हती. याचा अर्थ असा की, या संघटनांना अत्याचारित महिलेवरील अन्यायापेक्षा महत्त्वाचे वाटते, ते हल्लेखोर अफताबचे मुस्लिम असणे. म्हणजे स्त्रीमुक्तीचे, स्त्रीअत्याचाराचे प्रश्न यांच्यासाठी केवळ आपल्या कम्युनल राजकारणासाठीचे हत्यार आहेत. तसे नसते तर आजवरच्या कित्येक भगिनींच्या अत्याचाराविरुद्ध या संघटना रस्त्यावर उतरलेल्या दिसल्या असत्या.

विधायक चर्चेला बगल

या ठिकाणी एका महत्त्वाच्या मुद्द्याची देखील नोंद घेतली पाहिजे. आजवर देशभरात जेव्हा जेव्हा स्त्रियांवरील पुरुषी मानसिकतेतून झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवले गेले आहेत, त्या महिला संघटना कधीही हिंदुत्ववादी विचाराच्या नव्हत्या. स्त्रियांच्या अत्याचाराविरुद्ध कायदे करणे, त्यासाठी सरकारशी संघर्ष करणे यामध्ये या संघटना सहभागी नसतात. असल्या तरी नियमाला अपवाद म्हणूनच. स्त्रीमुक्तीचा प्रश्न, स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा यामध्ये ते काम करत नाहीत. अन्याय होणाऱ्या बहुतांश महिला हिंदू असल्या तरी.

अत्यंत आधुनिक स्त्रियादेखील आपल्याला कमालीच्या जाचक ठरणाऱ्या नात्यामधून लगेच बाहेर येऊ शकत नाहीत. आपल्या जीवाला धोका आहे हे जाणवल्यावरदेखील या स्त्रिया असा निर्णय घेण्यात कमालीचा दुबळेपणा दाखवतात, हे सर्व अस्वस्थ करणारे आहे. पुरुषी समाजव्यवस्थेच्या त्या किती अधीन झालेल्या असतात आणि आपण मुलींना लहानपणापासून कसे वाढवले पाहिजे, हे सर्व खरे तर श्रद्धा वालकरच्या हत्येच्या निमित्ताने चर्चेला यायला हवे.

पण त्यालाच बगल दिली जाते. आपल्या कम्युनल राजकारणासाठी ते स्त्रीमुक्तीच्या खोलवरच्या आणि विधायक चर्चेचा, मुद्द्यांचा बळी देत आहेत. हीच गोष्ट हिंदुत्ववादी संघटनांनी आणि भाजपने शाहबानो प्रकरणी केली. शाहबानो प्रकरणी देशातील दोन विरोधी पक्षांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. हे दोन्ही पक्ष कम्युनिस्ट पक्ष होते. त्यांनी म्हटले की, शाहबानो ही मुस्लिम स्त्री असली तरी ती प्रथम स्त्री आहे. एक व्यक्ती आहे. तिचे मुस्लिम असणे हे महत्त्वाचे नाही. म्हणून तिलादेखील इतर धर्माच्या स्त्रियांना जसे घटस्फोटानंतर पोटगीचे अधिकार आहेत तसेच अधिकार असले पाहिजेत.

पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपने अशी नाही भूमिका घेतली. त्यांनी तत्कालीन राजीव गांधी सरकारवर ‘शाहबानो नावाच्या व्यक्तीवर तुम्ही ती केवळ मुस्लिम धर्मात जन्मली म्हणून तिचे हक्क काढून घेत आहात’, अशी टीका नाही केली. त्यांनी या प्रकरणाचा वापर हिंदूंमध्ये अन्यायग्रस्ततेची भावना जागवण्यासाठी केला. शाहबानोवर अन्याय करणे म्हणजे जणू काही संपूर्ण मुस्लिम समाजाच्या बाजूने पक्षपात, असे समीकरण मांडत भाजपने त्याचा भरपूर राजकीय उपयोग करून घेतला. त्यात बळी गेला स्त्रीस्वातंत्र्याच्या मुद्द्याचा. आणि ज्या पक्षांनी स्त्रीस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करून शाहबानोच्या बाजूने राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांनादेखील भाजपने मुस्लिमांचे लांगूनचालन करणारे ठरवले.

आज वातावरण इतके कमालीचे धर्मवादी केले गेलेय की स्त्रीमुक्तीच्या किंवा व्यक्तिस्वातंत्र्याच्या कोणत्याही मुद्याचा धर्मवादी राजकारणाच्या वेदीवर बळी दिला जातोय. या देशातील बहुसंख्य समाजाला हा धोका समजायला किती वेळ लागेल कुणास ठाऊक! कदाचित जेव्हा समजायला सुरवात होईल तेव्हा खूप उशीर झाला असेल आणि या धर्मवादी राजकारणाच्या आगीत व्यक्तिस्वातंत्र्य कायमचे थिजून जाईल.

(लेखक सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT