dr verghese kurien sakal
संपादकीय

‘धवल’ कार्याचा मानदंड

भारतात १९५०-६० च्या दशकात तत्कालिन ३५ कोटी लोकसंख्येला पुरेसे दूध नव्हते, हे आज वाचून खरे वाटणार नाही. तेव्हा न्यूझीलंडसारख्या देशाकडून आपण दुधाची आयात करायचो.

सकाळ वृत्तसेवा

- प्रवीण प्र. वाळिंबे

दुग्धक्रांती घडविणारे डॉ. वर्गिस कुरियन यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण.

भारतात १९५०-६० च्या दशकात तत्कालिन ३५ कोटी लोकसंख्येला पुरेसे दूध नव्हते, हे आज वाचून खरे वाटणार नाही. तेव्हा न्यूझीलंडसारख्या देशाकडून आपण दुधाची आयात करायचो. मात्र, आज जगात सर्वांत मोठा दूध उत्पादक देश असा नावलौकिक आपल्या देशाने मिळवला असून, आपण दूध निर्यातही करतो, याचे मोठे श्रेय देशाचे ‘मिल्क मॅन’ म्हणून गौरविले गेलेले डॉ. वर्गिस कुरियन यांना द्यायला हवे.

डॉ. वर्गिस कुरियन केरळचे. चेन्नईतील लॉयला हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेऊन ते पुढे १९४०मध्ये पदार्थ विज्ञान विषयात पदवीधर झाले व त्यानंतर ते मेकॅनिकल इंजिनिअरही झाले. जमशेदपूर येथे ‘टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट’मध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर शासकीय शिष्यवृत्ती घेऊन ते अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले. तेथे एम. एस. ही पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर ते भारतात परतले.

अमेरिकेहून परतल्यानंतर भारत सरकारने त्यांची आणंद येथे डेअरी विभागात पाच वर्षांसाठी व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली. येथेच त्यांची गांधीविचारांनी प्रभावित झालेले त्रिभुवनदास पटेल यांच्याशी भेट झाली. त्यांनी गुजरातमधील आणंद परिसरातील दूध उत्पादक छोट्या शेतकऱ्यांना एकत्र आणण्याची चळवळ १९४६मध्ये सुरू केली होती.

ब्रिटिशांच्या राज्यात ‘पोल्सोन’ कंपनीला सर्वांना सक्तीने दूध द्यावे लागायचे. त्याचे दरही कमी असायचे. त्यामुळे संघर्ष करीत त्रिभुवनदास पटेल यांनी या स्वातंत्र्यपूर्व काळात ‘कायरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ’ १४ डिसेंबर १९४६ रोजी स्थापन केला होता व अखेरीस पोल्सोन कंपनीला गाशा गुंडाळावा लागला होता. डॉ. वर्गिस कुरियन यांनी या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकारी चळवळीची ताकद ओळखून त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा संकल्प केला.

दुग्धक्रांती

डॉ. वर्गिस यांचे मित्र आणि दुग्धतज्ज्ञ एच. एम. दलाया यांनी म्हशीच्या दुधाची पावडर व आटवलेले दूध तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. यापूर्वी फक्त गायीच्या दुधाचीच पावडर तयार व्हायची. या संशोधनामुळे देशात दुग्धक्रांती झाली. ‘अमूल’ डेअरीच्या या प्रकल्पामुळे गुजरातच्या अन्य जिल्ह्यांतही हे तंत्रज्ञान पोहोचले व नंतर ते देशभर पसरले. त्यासाठी डॉ. वर्गिस यांनी मोठी मेहनत घेतली. डॉ. कुरियन यांच्या प्रयत्नांमुळे दूध उद्योगाचा विकास होत असताना १९६५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी डॉ. वर्गिस यांच्या कामाने प्रभावित होऊन ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड’ची स्थापना केली व त्याचे अध्यक्षपद डॉ. वर्गिस कुरियन यांच्याकडे सोपविण्यात आले.

‘अमूल’ ऊर्फ ‘गुजरात को-ऑप. मिल्क मार्केटिंग फेडरेशन लि.’चा विस्तार डॉ. कुरियन यांनी देशाच्या कानाकोपऱ्यायात केला. दूध उत्पादकांना प्रोत्साहन देत दुधाचे संकलन, तपासणी, ग्रेडेशन या सर्वांची देशव्यापी यंत्रणा उभारली. एवढेच नव्हे, तर शेतकर्‍याने दूध दिल्यानंतर तपासणी व ग्रेडेशन करून लगेच त्या दुधाचे पैसे देण्याचीही व्यवस्था केली. पुढे त्यांनी सहकारी दूध चळवळीला चांगले व्यवस्थापक मिळावेत, यासाठी १९७९ मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट’ची आनंदमध्ये स्थापना केली.

‘अमूल’ ब्रँड दुधाबरोबरच दुग्धजन्य पदार्थांची यशस्वी निर्मिती करून त्यांनी ‘अमूल’ला घराघरात पोहोचवले. ‘अमूल’ ब्रँडचे चॉकलेट, आईस्क्रीम, बटर, चीज, कुकीज, ब्रेडस्प्रेड, दही, पनीर, चीजसॉस, बेव्हरेज, शीतपेये, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम, मिठाई मेट, हॅपी ट्रीट्स, अमूल प्रो, बेकरी प्रॉडक्ट्स, पीनट स्प्रेड, पफल्स, पंचामृत अशा दर्जेदार व परवडणार्‍या दरामधील उत्पादनांमुळे ‘अमूल’ची यशोगाथा सदैव उंचावत गेली. ‘अमूल’ची २०२१ मधील वार्षिक उलाढाल ५५ हजार कोटी रुपयांवर गेली, यावरूनच ‘अमूल’चे यश दिसून येते.

त्यांची पत्नी मॉली आणि कन्या निर्मला यांच्यासह संसार करणारे डॉ. वर्गिस कुरियन यांचा दुसरा संसार म्हणजे ‘अमूल’ होता! देशाला दूध उत्पादनात अग्रेसर बनविणारे आणि दुधाचे दुर्भिक्ष असणार्‍या देशाला दुधाचे निर्यातदार बनवणे एवढी मोठी महनीय क्रांती दूरदृष्टी आणि उत्तम व्यवस्थापनाच्या आधारे त्यांनी केली. ‘पद्मविभूषण’ने त्यांना गौरवण्यात आले होते. याशिवाय अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT