Pune Edition Article on Dhing Tang
Pune Edition Article on Dhing Tang 
संपादकीय

"त्यांच्या' घरचं आवतण ! (ढिंग टांग ! ) 

सकाळवृत्तसेवा

बेटा : (अत्यंत सळसळत्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!... अँड आयॅम गोइंग! 
मम्मामॅडम : (चमकून) कुठे निघाला आहेस? 
बेटा : (हातातला कागद फडकवत) मला निमंत्रण आलंय! कुणाचं ओळख बरं? 
मम्मामॅडम : (कोरडेपणानं) कुणाच्या तरी लग्नाबिग्नाचं असेल! हल्ली हे फिल्मी लोक इटलीला जाऊन लग्नबिग्न करतात!! काही तरी नवीन फॅड!! 
बेटा : (हात झटकून) इटलीतलं निमंत्रण नाहीए मम्मा! इथलंच आहे... 
मम्मामॅडम : (आश्‍चर्यानं) कुणी वास्तुशांतीला बोलावतंय का? 
बेटा : (कपाळाला आठ्या घालत) आँऽऽ...अगदीच वास्तुशांतीला नाही, पण तसंच काहीसं आहे!! तिथं मला जोरदार भाषण करायची संधी आहे!! 

मम्मामॅडम : (निक्षून सांगत) यंदा रामलीलेला जायचं नाही हं!! आधीच सांगून ठेवते!! 
बेटा : (मंदपणे हसत) रामलीलेचंही निमंत्रण नाहीए...पण "रामलीला-टाइप'च काहीसं आहे, हे खरंय!! 
मम्मामॅडम : (वैतागून) कोड्यात बोलू नकोस! नक्‍की कुणाचं निमंत्रण आहे, ते सांगून टाक!! 
बेटा : (आणखी पीळ देत) अशा ठिकाणी मला बोलावलंय, जिथं तुला कुणीही कधीही बोलावलं नाही, बोलावणार नाही! किंबहुना, अशा ठिकाणी जाऊन भाषण करणारा मी आपल्या पक्षाचा पहिलाच अध्यक्ष असेन!! "भविष्यातील भारत' ह्या विषयावर मला बोलायचं आहे!! 
मम्मामॅडम : (फारच वैतागून) कुठे का जाईनास...सुखरूप परत ये म्हणजे मिळवलीन!! 
बेटा : (धक्‍कातंत्र अवलंबून) मम्मा, मी आता आरेसेसच्या शाखेत जाणार आहे!! 
मम्मामॅडम : (प्रचंड धक्‍का बसून) क्‍काय? काय म्हणालास? शाखेत? 
बेटा : (डोळे मिटून) बरोबर ऐकलंस...शाखेत! आपल्या घराजवळच एका मैदानात भरते म्हणे!! 
मम्मामॅडम : (कानांवर हात ठेवत) हे मी काय ऐकते आहे? आपल्या खानदानातलं कुणीही त्या ठिकाणी गेलेलं नाही, बेटा!! 
बेटा : (निर्धारानं) आता जाईल!! 

मम्मामॅडम : (महत्प्रयासाने संयम ठेवत) हे बघ, तू अशा कुठल्याही ठिकाणी जाणार नाहीएस! एकवेळ पुन्हा विपश्‍यना करायला थायलंड का कुठे जायचंय तिथं जा! इगतपुरीला गेलास तरीही माझी काही हरकत नाही!! गोव्याला जाऊन मजा करून आलास तरी मी काही बोलायची नाही, पण श..श...श...छी:!! नाव घ्यायलासुद्धा काहीतरीच वाटतं! 
बेटा : (गंभीर मुद्रेनं) आरेरेसची शाखा कशी असते हे आतून बघायचंच होतं मला!! आयती संधी आली आहे, का सोडा? 
मम्मामॅडम : (हबकून) आतून म्हंजे? माझ्या माहितीप्रमाणे तो प्रकार ते लोक उघड्यावरच करतात! आतून-बाहेरून काहीही नसतं! म्हणजे असं मला वाटतं!! मी तरी कुठे बघितलाय तो प्रकार? 
बेटा : (समजूतदार मंद स्मित करत) तो प्रकार वगैरे नाहीए मम्मा! आरेसेसचं काम कसं चालतं हे माहीत करून घेणं माझं कर्तव्य आहे! कारण ते समजल्याशिवाय मला माझा देश कसा आहे, हे समजणार नाही, असं काही लोक म्हणताहेत!! 
मम्मामॅडम : (चिडून) तू शाखेत जाऊन भाषण करच..मग बघ... 

बेटा : (धीरगंभीरपणे) त्याला भाषण नाही, बौद्धिक म्हणतात, मम्मा!! मी तर शाखेचा गणवेशदेखील शिवायला टाकला आहे!! कधी एकदा तिथं जाऊन बौद्धिक घेतो, असं झालंय!! 
मम्मामॅडम : (बोट नाचवत) खबरदार, जर...! 
बेटा : (डोळे मिचकावत) डोण्ट वरी मम्मा! तिथले लोक मला हल्ली जाम घाबरतात! माझी जादूची एक झप्पी त्यांचं सगळं गर्वहरण करून टाकेल! क्‍यों? सही है के नही!! तिथं जाऊन त्यांना फक्‍त एकच सांगणार आहे- तुमची लाठी, आमची मिठी!! हाहा!! कशी आहे आयडिया? 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT