kalabahar sakal
satirical-news

‘कला हा जगण्याचाच भाग’

कलाबहर

सकाळ वृत्तसेवा

- गायत्री तांबे देशपांडे

‘क ला ही माझ्यासाठी एक व्यवसाय नाही.. ती माझ्या जीवनाचाच एक भाग आहे. ती माझ्यातच आहे, माझ्यापासून वेगळी नाही.’ असं सांगणारी शुभा गोखले. लोभस अशी शुभा कधीकधी अक्षरशः तिच्या चित्रांतूनच बाहेर आल्यासारखी वाटते. ‘मला चित्र काढायला आवडतं म्हणून मी चित्र करते.ती माझी गरज आहे’ असं जेव्हा ती सांगते तेव्हा ते पटतंही. तिची केवळ चित्रंच नव्हे तर तिने बनवलेले अलंकार, तिची फॅशनची समज, आणि अनेक इतर आलंकारिक वस्तू त्याचा पुरावा आहेत. ‘माझं एक चित्र जरी तुमच्या लक्षात राहिलं, तरी मी खूप कमावलं असं समजेन,’ असे तिचे सांगणे आहे. अभिनव कला महाविद्यालयात कलाशिक्षण घेतानाच तिला जाणवत होतं, तिला अजून खूप काही शिकायची व करायची भूक आहे.

त्यासाठी मग त्या काळात १९७९च्या आसपास, आठवड्यातून एकदा मुंबईवारी सुरू केली. नवनवीन चित्रप्रदर्शनं बघितली. प्रत्येक गोष्टीत काही तरी चांगलंच बघणारी शुभा यातून खूप काही शिकली, शिकते. कलेचा सुवर्णकाळ तिने अनुभवलाय. स्वतःबद्दल कुठलाही गैरसमज न बाळगता तिने ओळखलं होतं, की तिचे रेखांकन कौशल्य कमी पडतंय आणि त्यासाठी मग तिने बापू देऊसकरांसारख्या प्रतिभावान कलाकाराकडे त्याची शिकवणीही घेतली. तिची तळमळ तिला काही स्वस्थ बसू देईना. आधी पुण्यात मग मुंबईला गेल्यावर ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचटांच्या स्टुडिओवरही तिला खूप शिकायला मिळालं. खास करून ॲक्रेलिक हे माध्यम. पण मुळात तिचा पिंड तैलरंगाचाच हे तिला चांगलं माहीत होतं. प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य टिपणाऱ्या शुभाच्या अनेक चित्रमालिका कलारसिकांत प्रसिद्ध आहेत. उदा. पपेटस्‌, न्यूडस्‌, नायिका, बाजार इत्यादी. तिची ‘पपेटस्‌’ ही मालिका तर विशेष प्रसिद्ध व व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरली. तो काळच असा होता, की तिला कठपुतळी असल्यासारखंच वाटत होतं.

त्या मालिकेत विषयाला अनुरूप तिने आकृत्यांची तोडमोडही केली. स्वतःशी प्रामाणिक राहून मात्र त्या मानसिक अवस्थेतून बाहेर पडताच तिची ती मालिका संपली. ‘मी ठरवून कधीच चित्र नाही करू शकत. ती घडतात.’ तिच्या साधनेत कधी अल्पविरामही आला, मग त्यात नैराश्‍यही डोकावून गेलेच. पण कलेच्या आधारे त्यातून ती लख्ख होऊन बाहेर आली. पपेटस्‌नंतर शरीरशास्त्राचा अभ्यास करतानाच ‘न्यूडस्‌’ मालिकेचा जन्म झाला. अगदी सहज. त्या काळातील कवी ग्रेस यांच्या संपर्काचा आणि कवितेचाही प्रभाव पडला. ‘माझी प्रत्येक मालिका मला जिथवर नेते, तिथवर मी जाते.’ तिच्या आवडत्या ‘स्थिर चित्र’ या विषयाने मात्र तिची साथ कधी सोडली नाही. त्यातील विविध पोत, आकार, छाया, प्रकाशाशी खेळण्यात ती रमते. शुभाची चित्रे चरित्रात्मक आहेत. या चित्रकर्तीमधे एक मोठा रसिक दडलाय. नाट्यरसिक! इतरांचे काम बघायला तिला जास्त आवडतं.

हे आयुष्य सुंदर आहे, यावर तिचा ठाम विश्‍वास आहे. आपण पंचेंद्रियांद्वारे कलेची अनुभूती घ्यावी असं ती कळकळीने सांगते. ‘स्वतःचे एखादे चित्र घरात लावावे.कला ही आपल्या जगण्याचाच भाग असली पाहिजे.’ प्रसिद्धीपासून दूर असली तरी शुभा माणूसघाणी नाही. तिच्या चित्रप्रदर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाशी ती संवाद साधते. ती त्याचं महत्त्व जाणते. आज सोशल मीडियावरही ती सक्रिय आहे. ‘माझ्यासाठी कला ही एक प्रक्रिया आहे. ज्यात भावनांचे मंथन घडते. या निर्मितीच्या प्रक्रियेत वेदनाही होतात. पण शेवटी जे दिसतं ते सुंदर अन्‌ कायमस्वरूपी असतं... माझ्यातला एक भाग असतं. दुःखाला विसरायला लावते ही कला हे ऐकताना लक्षात येतं कवी ग्रेस यांनी तिच्या स्टुडिओला ‘गोंदणगांव’ हे नाव किती अचूक दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT