dhingtang
dhingtang 
satirical-news

ढिंग टांग :  चष्मेबद्दूर!

ब्रिटिश नंदी

म्हारा प्रिय नान्हाभाई उधोजीभाई, सतप्रतिसत प्रणाम अने अनेकोनेक उत्तम आसीर्वाद. तमारा पत्र मळ्या! काले बऱ्याच दिवसांनी तुमच्या दर्सन पण (ओनलाइन) मीटिंगमधी झ्याला. बहु सारु! केटला मजा आवी गया!! तुम्हाला फॉन करीने ख्यालीखुशाली विचारावी, असे बरेच दिवस वाटत होते, पण टाइम मळलाच नाही. (अर्थ : मळला एटले मिळाला!) तुमच्या ‘मारा कुटुंब, मारी जिम्मेवारी’ या योजनेबद्दल कळला! ऐकून च्यांगला वाटला. मी पण तुमच्या कुटुंबातलाज एक आहे...जवां दो. 

काले झालेल्या ओनलाइन मीटिंगमधी तुम्ही एक चोक्कस वात सांगितली, ती मी लक्षात ठेवणार, अने लोगांना पण सांगणार! आवती ‘मन की वात’ मां हुं एऊ वातना उल्लेख जरुर करीश!!

मास्क आ तो नवु चष्मा छे! केटरी सीधी अने सारी वात कही? खरेखर मला तुमच्या कौतुक अने अभिमान पण वाटला. मारा नान्हाभाई हवे मोटा थई गया, असा मनात आला! मास्क लावला के बहु तकलीफ होते.चष्माऊप्परथी वाफ धरे छे! पण करायच्या काय? मास्क अने चष्मा दोन्ही वापरावाज लागणार. मास्कची सवय करायला पाहिजे, हा तुमच्या विच्यार एकदम सतप्रतिसत चोक्कस आहे. भविष्यमधी आपड्या लोगांना मास्क वापरणे कंपल्सरी होणार आहे. त्याची आदत कशी पाडून घ्यायची, याचा प्रबोधन आपण दोघे मिळूनशी करु या के? एनेउप्पर विचार करो. पछी वात करुं छू. बाकी सब ठीकठाक छे. जे श्री क्रष्ण. आपडाज. नमोजीभाई.

ता. क. : मराठी लोग बहु बहादूरजेवा लडेछे, असा मी ओनलाइन मीटिंगमधी बोलला, ते फक्त तुमच्यासाठी होता! एटला ध्यान मां राखजो! जे श्री क्रष्ण. नमो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय नमोजीभाई, जय महाराष्ट्र, आपले पत्र मिळाले. वाचता वाचता प्राण कंठाशी आले. मराठी आणि गुजराथीही ही मिसळ सहन होण्यासारखी नाही. ढोकळ्याबरोबर श्रीखंड कोण खाते? असो.

मास्कची सवय  आपल्या सर्वांनीच करायला हवी, यात काही शंका नाही. अनेक लोक मला भेटून ‘मास्कची सक्ती कधी जाणार?’ असे विचारतात. (माझ्या) महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये आम्ही एकेक गोष्ट अनलॉक करत चाललो आहोत. एकवेळ मी हाटेलं आणि जिम उघडीन, पण मास्क उघडायला कधीही परवानगी देणार नाही, असे मी आमच्या लोकांना निक्षून सांगितले आहे. मास्क ही अत्यावश्‍यक गोष्ट असून त्याची सवय करायलाच हवी. पूर्वीच्या काळी चष्मा लागला की त्याची सवय होईपर्यंत त्रास होत असे. मला झाला! कधी चष्मा नाकावर ओघळायचा, तर कधी धुरकट दिसायचे. पण हळू हळू सवय झाली. आता मास्कची पण तशीच सवय झाली आहे. एक दिवस आपण मास्कचे चष्म्यासारखेच होईल. कधी लावला आणि काढला (आणि हरवला) ते कळणारदेखील नाही!!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही माझ्या सूचनेची दखल घेतलीत! आभार!! मास्क आणि चष्मा दोन्हीचा एकत्रित बंपर सेल तुम्ही आता लावाल, याची खात्री आहे!!

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही आम्ही (माझ्या) महाराष्ट्रात राबवलेली अभिनव योजना आहे. या योजनेत तुमचा सहभाग अपेक्षित नाही. तुम्ही कायम लोकांच्या कुटुंबात घुसण्याचा प्रयत्न करीत असता. तो इथे चालणार नाही. कळावे. आपला. उधोजी.

ता. क. : मराठी माणस बहादूरजेवा लडे छे म्हंजे? लढतोच! किंबहुना लढणारच. सोडणार नाही, म्हंजे नाही! मराठी माणसाचं ते वैशिष्ट्यच आहे. उ. ठा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT