Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : महागाईचे अभंग!

बरे केले देवा । केलो चाकरमानी। जैसे सुणें इमानी। दारापाशी।।

- ब्रिटिश नंदी

बरे केले देवा । केलो चाकरमानी।

जैसे सुणें इमानी। दारापाशी।।

भाकरी पुढ्यात । पडे कोरभर।

तेवढे पोटभर । पुरे झाले ।।

भावभिने सुणें। हालवी शेपूट ।

प्रेमाची लयलूट । पोटासाठी ।।

सौंसार आमुचा । किडुक मिडुक ।

त्यात परंसुख । शोधतो गा।।

अल्प अल्प जीव । अल्पसा संतोष।

कुणावरी रोष । नाही नाही ।।

झोडिते अस्मान । हाणितो सुल्तान ।

तरी गा गुमान । आम्ही सारे ।।

कोणीही गा यावे ।

टिचकी मारोनिया जावे ।

आम्ही जीवेभावे । वांकू तेव्हा ।।

विषाणूंने केले। आम्हासी बेजार ।

केवढा बाजार। औषधांचा ।।

मृत्यूच्या छायेत । आमुचा वावर ।

तगादा तक्रार । काही नाही ।।

ऐसी साडेसाती। बिघडे कुंडली।

ग्रहांची धांदली । अमंगळ ।।

तरीही कधीही । नाही उमटली ।

विव्हळ किंकाळी । हूं की चूंही।।

देवा तुवा का रे । ऐकू न ये साद ।

जाहलो मोताद । उ:शापाला ।।

घरां ये वरवंटा । हाताशी करवंटी ।

वाजली ना घंटी । नशिबाची ।।

महागाई ऐसी। कर्कशा चेटकी ।

हांसते लटकी । खाय खाय ।।

काय फिरविसी। आम्हा जगदीशा।

साऱ्या दाहीदिशा । अन्नासाठी ।।

महागाई झाली। केवढी चढेल ।

आमुचे पडेल । चेहरे तैसे ।।

खिशामाजी नाही । पैसा नि अडका ।

रोजच्या धडका । भिंतीवरी ।।

काय मारु आता । दातांवरी देवा ।

पोटात वणवा । भुकेचा गा ।।

कशीबशी आम्ही । करितो गुजराण ।

तरी धूळधाण । आयुष्याची ।।

आमुची गा आहे। दुनिया दीडवीत ।

हीच जगीं रीत । आहे ना रे? ।।

नवल की वाटे । तुझे विश्वंभरा ।

आहेस तू खरा । आहेस ना? ।।

असशील कोठे । तूच माझा हरी ।

देशी खाटेवरी। ऐसे कानी ।।

तुझे मौन देवा । आहे भयंकर ।

तुजविण चराचर । उफराटे ।।

जगणे महाग । नित्य ओढघस्त ।

मरण हे स्वस्त । ऐसे झाले ।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT