Dhing-Tang
Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : ‘कोट्या’धीश कारभारी!

ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक. वेळ : रात्र समय!
चि. विक्रमादित्य : (दार ढकलून खोलीत शिरत) हे देअर बॅब्स...मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (कानटोपी चढवत) नोप! इन नाही, नि आऊट नाही!  मी दमलोय! गुडनाइट!!
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) दमायला काय झालं? ही नाइट इतकी गुड आहे की मस्त बाहेर पडून पावभाजी खावीशी वाटतेय, नाहीतरी नाइटमध्ये ‘इट’ आहेच! हाहा!!
उधोजीसाहेब : (संताप गिळत) हा विनोद होता?

विक्रमादित्य : (खुशीत) तुमच्याकडूनच शिकलो! बाकी कालचं तुमचं रस्ते सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमातलं भाषण टॉप क्‍लास होतं, बॅब्स! केवढे पन केले तुम्ही! वॉव!!
उधोजीसाहेब : (गोंधळून) पन?
विक्रमादित्य : पीयूएन पन...माने शाब्दिक कोटी!! तुस्सी कोट्याधीश हो, बॅब्स! लोक केवढे हसत होते!! 
उधोजीसाहेब : (न राहवून) मी कोटी करतो, आणि विरोधकांची चकोटीही!!
विक्रमादित्य : (चकित होत हर्षभराने) वॉव!..पुन्हा कोटी!! त्वाडा जबाब नही!!
उधोजीसाहेब : (चेव येत) जी बाब  महत्त्वाची नाही, तिचा रुबाब करु नये! शाब्दिक कोट्या ठीक आहे, पण आपण लोकांची कामं किती करतो, याला महत्त्व असतं! विरोधकांचे कबाब करुन महाराष्ट्राच्या रयतेसाठी लाजबाब काम करुन दाखवलं नाही तर नाव लावणार नाही!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विक्रमादित्य : (‘मेरी भी उप्पर एक दुर्री’ टाइप...) यालाच जबाबदारी म्हणतात ना बॅब्स?
उधोजीसाहेब : (निक्षून सांगत) आता थांब हां! थांबला नाहीस, बोंबलायची पाळी येईल!
विक्रमादित्य : (साफ दुर्लक्ष करत) राज्य रस्ते सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमात तुमच्या कोटीबाज भाषणामुळे इतकी धमाल आली की विचारु नका! कोट्याधीश पुलं माहीत होते, पण तुम्हीही कोट्याधीश कारभारी आहात!!
उधोजीसाहेब : (घाईघाईत) कारण मी कार आणि सरकार दोन्ही चालवतो!  
विक्रमादित्य : आणि शिकारही करता! हो ना?
उधोजीसाहेब : (उडवून लावत) ही कोटी टुकार आहे! 
विक्रमादित्य : (अजिबात न ऐकता...) स्वत: चिक्कार कोट्या करताना दुसऱ्याच्या कोट्यांना टुकार म्हणणं, हा अहंकार आहे!
उधोजीसाहेब : बास ना आता! पुष्कळ झालं!
विक्रमादित्य : (शांतपणे) तुम्हीच पुश केलंत, आणि कळ काढलीत!  
उधोजीसाहेब : (गांभीर्यपूर्वक) शाब्दिक कोट्या करणं हे बुद्धिमत्तेचं लक्षण असतं! पण त्या करताना सत्तेचं स्टेअरिंगचं चाक हाती असलं पाहिजे! तू शिकून घे!
विक्रमादित्य : (नम्रपणे) मी शिकतोच आहे बॅब्स! माझ्या शिकण्यामुळे कमळाबाई शिक पडली आहे!! तिला वाटत होतं, की मी नवशिक आहे!! हाहा!!
उधोजीसाहेब : (दाद देत) शाब्बास! तसा तू रशिक दिसतोस! तुला माझ्या शाब्दिक कोट्या आवडतात!
विक्रमादित्य : (एक पाऊल पुढे...) सोशिक म्हणायचंय का तुम्हाला?
उधोजीसाहेब : (प्रयत्नपूर्वक शांत राहात) हे बघ, शाब्दिक कोट्या करताना जिभेवर ताबा हवा, नाहीतर तोबा करण्याची पाळी येते! राजकारणातला हा मूलभूत नियम आहे! संयम हवा, संयम! संयम आणि नियम नसेल तर यम जवळ येतो!
विक्रमादित्य : (हाताची घडी घालत) हे मी कायम लक्षात ठेवीन!
उधोजीसाहेब : (निर्वाणीच्या पवित्र्यात) आता मात्र फायनल गुड नाइट!
विक्रमादित्य : (शेवटला घाव...) बॅब्स, तुम्ही कोट्याधीश आहात हे कमळाबाईनं ‘इडी’ला कळवलं तर?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT