Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : मुंबई ते गुवाहाटी : एक प्रवासवर्णन!

‘केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार’ असे कुणीसे म्हटलेच आहे. पण चातुर्य आल्यामुळेही मनुष्य देशाटन करतो, हे मी अनुभवाने सांगीन.

ब्रिटिश नंदी

‘केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार’ असे कुणीसे म्हटलेच आहे. पण चातुर्य आल्यामुळेही मनुष्य देशाटन करतो, हे मी अनुभवाने सांगीन.

‘केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार’ असे कुणीसे म्हटलेच आहे. पण चातुर्य आल्यामुळेही मनुष्य देशाटन करतो, हे मी अनुभवाने सांगीन. काही लोक महाराष्ट्राच्या भल्यासाठी देशाटनाला जातात. माझे असेच झाले. एक दिवस मेसेज आला की, ‘‘कॉग्रेच्युलेशन्स! आपको अनलिमिटेड अवधी के लिए किसी हिल स्टेशनपर छुट्टियां मनाने की ऑफर दी जाती है-वह भी बिलकुल फ्री फ्री फ्री!! तुरंत संपर्क करें...’ कसाही असलो तरी मी शेवटी मराठी माणूस आहे. फुकट म्हटले की फोन करणारच.- केला! पलिकडल्या भगिनीने मंजुळ आवाजात माझे तिकिट बुक झाल्याचे आनंदवृत्त दिले.

‘फुकटात कुठे जायचंय?’ मी विचारले. ती म्हणाली, ‘गुवाहाटी!’ हिलस्टेशनचे नाव गुवाहाटी? मला खरे तर नाव अजिबात आवडले नव्हते. (मनात म्हटले, ‘शी:!’) पण फुकट होते म्हणून गेलो. गुवाहाटी म्हणजे प्राचीन कामरुप देशाची राजधानी. भरपूर झाडी, मोठाले डोंगर आणि भारी हॉटेले. संपूर्ण आसाम हे चहाचे मळे आणि महापूर यासाठी प्रसिद्ध आहे. अर्थात तिथेही चहा मळ्यात नव्हे, तर टपरीवरच मिळतो, हे नंतर कळले. तिथले कामाख्या मंदिरही सुप्रसिद्ध आहे. तिथे मंत्रतंत्र वगैरे चालतात असे कळले. रेडे बळी देतात म्हणे! मी म्हटले, तिकडे नकोच जायला.

...घरातून न्यायला गाडी आली. सामान (माझ्यासकट) उचलून गाडीत टाकण्यात आले. आधी प्रचंड खड्डे आणि वाहतुकीने धक्के खात काही तास प्रवास केल्यावर अचानक रस्ते गुळगुळीत झाले. त्याअर्थी गुजरातमध्ये आम्ही प्रवेश केला होता. डोळे उघडले, तेव्हा सुरत आले होते. सुरतेहून स्पेशल विमानाने गुवाहाटीला जायचे आहे, असे सांगण्यात आले. त्याआधी सिंगल इडली आणि सिंगल वडा विथ सांबार (फुकट) देण्यात आले. एका छोट्याशा विमानात मला आग्रहपूर्वक चढवण्यात आले.

‘हे बारके विमान गुवाहाटीपर्यंत नक्की जाणार का?’ असे मी पायलटला शंकाकुल होऊन विचारले. पायलट हसून म्हणाला, ‘डोण्ट वरी! तुमच्याआधी मी ३८ जणांना एअरड्रॉप केलं आहे!’ त्याने ‘एअरड्रॉप’ इतके ठासून म्हटले की माझ्या पोटात खड्डाच पडला. खुर्चीखाली प्याराशूट आहे का ते मी तपासून पाहिले. नव्हते! मला मळमळू लागले. विमानात मी एकटाच पॅसेंजर होतो, आणि दोन क्रूर दिसणारी माणसे होती. ती बाजूलाच बसली होती. बराच वेळ गेल्यानंतर खाली थोडी हिरवळ, पर्वतराजी दिसू लागली. एक नदीही दिसली. या भागात पूर आल्याचे कुणीसे सांगत होते. ते दृश्य बघून पायलट म्हणाला, ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल...एकदम ओक्केमध्ये हाय सगळं!’

गुवाहाटीच्या विमानतळावर उतरुन थेट ठरलेल्या पंचतारांकित हाटिलात गेलो. तिथे दाराशीच ‘आपलं माणूस’ ऊर्फ मा. एकनाथजी शिंदे उभे होते. ‘कसा झाला प्रवास?’ त्यांनी प्रेमाने विचारले. ‘जीव मुठीत धरुन आलो’ हे सांगण्याचे धाडस झाले नाही.

‘प्रवासात झोप झाली का?’ त्यांनी विचारले. मी ‘हो’ म्हटले.

‘खाणंपिणं?’ मी पुन्हा होकार दिला.

‘मग ठीक आहे. इथे हाटिल भारी असलं तरी जीव मुठीत धरुन जगावं लागेल. झोप मिळणे अशक्य आहे. अन्नही गोड लागणं कठीण! तेव्हा तयारीत रहा!’ असे बजावून ते कुठेतरी निघून गेले. आज तीन दिवस झाले. आंघोळही केलेली नाही. पण महाराष्ट्रासाठी एवढे केलेच पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT