Kakasaheb Chitale sakal
संपादकीय

सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक

भिलवडी येथील प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाचे ज्येष्ठ उद्योजक काकासाहेब चितळे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व. उद्योगाच्या धवलक्रांतीबरोबर त्यांनी हयातभर सामाजिक बांधिलकी जपली.

सतीश तोडकर

भिलवडी येथील प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाचे ज्येष्ठ उद्योजक काकासाहेब चितळे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व. उद्योगाच्या धवलक्रांतीबरोबर त्यांनी हयातभर सामाजिक बांधिलकी जपली. समाजजीवन समृद्ध व्हावे, यासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत झटले. त्यांचा आज (ता. ८) चतुर्थ स्मृतिदिन.

कृष्णाकाठावरील भिलवडीमध्ये ७७ वर्षांपूर्वी काकासाहेबांचे वडील भास्कर गणेश तथा बाबासाहेबांनी दुग्ध व प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. काकासाहेब आधुनिकता व भारतीय संस्कृतीचे मिलाफ होते. त्यांनी बंधूच्या सहकार्याने धवलक्रांती साधली. डेअरीच्या विस्तारासह व्यवसायाचा केंद्रबिंदू असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणले. जातिवंत दुधाळ जनावरे ‘कृष्णा’काठी आणून दुग्धोत्पादन वाढविले.

तीस वर्षांपूर्वी उद्योगात डिजिटल तंत्रज्ञान आणले. या उद्योगाने ग्रामीण भागातील हजारो तरुणांना हक्काचा रोजगार दिला आहे. एखादा उद्योग विशिष्ट मर्यादेपार गेल्यास तो एकट्याचा न राहता अवघ्या समाजाचा होतो, अशी त्यांची नेहमीच धारणा राहिली. उद्योगासह सार्वजनिक जीवनातही त्यांनी सचोटी, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा जपला.

समाजातील सर्व क्षेत्रांशी, घटकांशी त्यांची नाळ अखंड राहिली. ग्रामस्वच्छता अभियानात ते गावचे धुरीण राहिले. अभियानानिमित्त निरंतर स्वच्छतेबरोबर गावात टिकाऊ काम उभारण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला. गावच्या सार्वजनिक वाचनालयाचे ते दीर्घकाळ अध्यक्ष राहताना त्यांनी वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले.

परिसरात ‘जायंट्स ग्रुप’ स्थापन करून समाजकार्य करणाऱ्यांची पथके तयार केली. वृक्षारोपण, देहदान, नेत्रदान, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान, त्वचादान चळवळ जोमाने उभी केली. विज्ञान व अध्यात्म याचा समतोल राखला. मंदिरांचा जीर्णोद्धार, एसटी निवारा केंद्रे उभारण्यासाठीही त्यांनी सहकार्य केले. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना सातत्याने मार्गदर्शन केले.

कला, क्रीडा, शिक्षण, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व कृषी अशा विविध क्षेत्रांशी त्यांचा निरंतर संवाद राहिला. शिक्षण संस्थेचे विश्वस्त, मुंबई माताबाल संगोपन केंद्राचे आश्रयदाते, विवेकानंद नेत्र चिकित्सालय, लायन्स नॅबचे आश्रयदाते म्हणून त्यांनी योगदान दिले. ‘कृष्णे’च्या महापुरावेळी आधारवडाची भूमिका निभावली. मदतनिधी उभारून पशुधनाला मुकलेल्यांना मदतीचा हात दिला. चितळे उद्योग सातासमुद्रापार पोहोचवण्यात मोठा वाटा उचलला. त्यांची चौथी पिढी त्यांचा वारसा पुढे चालवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT