Aasha Bhosale and Chittaranjan Kolhatkar sakal
संपादकीय

रंगात रंगूनही निर्लेप

रंगभूमी आणि रुपेरी पडदाही गाजवलेले प्रख्यात अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे जन्मशताब्दी वर्ष १५ जानेवारीला सुरू झाले. त्यानिमित्त एका दिग्दर्शकाने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

सकाळ वृत्तसेवा

रंगभूमी आणि रुपेरी पडदाही गाजवलेले प्रख्यात अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे जन्मशताब्दी वर्ष १५ जानेवारीला सुरू झाले. त्यानिमित्त एका दिग्दर्शकाने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

- श्रीनिवास भणगे

रंगभूमी आणि रुपेरी पडदाही गाजवलेले प्रख्यात अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे जन्मशताब्दी वर्ष १५ जानेवारीला सुरू झाले. त्यानिमित्त एका दिग्दर्शकाने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

ऑगस्ट १९७३मध्ये मी चित्तरंजन कोल्हटकर या नटाला, रंगमंच आणि रुपेरी पडद्याशिवाय साक्षात पाहिलं. त्या विशिष्ट वयात नटाकडे पाहण्याचा आपला एक दृष्टिकोन असतो. नाटक आणि सिनेमानं वेडावलेल्या माझ्यासारख्या (त्यावेळच्या) तरुणाचा तरी तो तसा होता. नटाला आपण त्याच्याभोवती असलेल्या वलयासकट पाहतो. ''चित्तरंजन कोल्हटकर'' हे तर त्यावेळचं चलनी नाणं होतं. हा नट त्यावेळच्या, मुख्य प्रवाहातल्या कुठल्याही गुणवंत आणि लोकप्रिय नाटकाचा अविभाज्य घटक होता. मराठी चित्रपटातलं खलनायकीचं कंत्रांट तर त्यांना उक्तंच मिळालं होतं. महाराष्ट्रातली रसिकता त्यांच्याभोवती रुंजी घालीत होती. त्यामुळे आमच्या एका नाट्यस्पर्धेचा बक्षीससमारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे, हीच आमच्या दृष्टीनं ग्लॅमरस गोष्ट होती.

आमचा नाट्यप्रयोगही त्यांनी लक्षपूर्वक बघितला. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांना जवळून पाहिलं. त्या क्षणी मला वाटलं, ''किती सभ्य, सुसंस्कृत आणि साधा गृहस्थ आहे हा!'' ही जी त्यांची प्रतिमा माझ्या मनावर उमटली ती कायमची. त्यांच्या अनेक भूमिका मी पाहिल्या होत्या. पडद्यावरच्या आणि रंगमंचावरच्या. या दोन्ही ठिकाणी त्यांच्याभोवती एक झगमगतं वलय असायचं. ती आभा त्यांच्याभोवती तिथे सतत असे. पण एरव्ही त्या झगमगाटाचा अंशही दिसायचा नाही. त्यांनी ज्या अनेकविध भूमिका केल्या त्या सर्व भूमिकांमधली ही सभ्य आणि सात्विक गृहस्थांची ‘भूमिका’ सर्वश्रेष्ठ आणि यशस्वी होती, असं मला वाटतं. परमेश्वरानं त्यांची शरीरयष्टी,चेहेरेपट्टी आणि स्वभाव या भूमिकेला अनुकूल असाच बहाल केला होता. तो आब त्यांनी दिमाखानं वागवला आणि सांभाळला.

त्यांनी बोट धरून मला व्यावसायिक रंगभूमीवर आणलं. माझं पहिलं व्यावसायिक नाटक, घालीन लोटांगण'' त्यांनी त्यांच्या वरद रंगभूमी या संस्थेतर्फे रंगमंचावर सादर केलं. ज्याच्या दिग्दर्शनाची आणि प्रमुख भूमिकेची जबाबदारी विश्वासानं माझ्यावर सोपवली. स्वतःही त्यात अगदी छोटी भूमिका आनंदानं केली. प्रोत्साहन मिळण्यासाठी माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला/लेखकाला यापेक्षा आणखी काय हवं होतं? त्या सगळ्या प्रक्रियेच्या वेळी मी त्यांच्या आणखी जवळ गेलो. त्यांच्या कुटुंबाशी परिचित झालो आणि मग त्याच्यापैकीच एक होऊन गेलो. खूप चर्चा केल्या, वादविवाद केले आणि मतभेदही झाले. पण तो माझ्यादृष्टीनं मराठी व्यावसायिक रंगभूमीचा एक शिक्षणक्रम होता. माझ्या दिग्दर्शनाखाली काम करीत असतानाच ते मला घडवत गेले. ''बापू'' म्हणताम्हणता, त्यांच्या कुटुंबीयांप्रमाणे त्यांना ''दादा'' ही म्हणू लागलो.

सरळमार्गी

त्या काळातल्या पुष्कळशा प्रसिद्ध, पहिल्या रांगेतल्या कलाकारांच्या अद्वितीय कलागुणांना व्यसनांचं किंवा अन्य काही नादांचं गालबोट लागलेलं असे. चित्तरंजन कोल्हटकर त्यापासून योजनं दूर होते. त्यांचे प्राधान्यक्रम सरळमार्गी होते. त्यांचं घर, त्यांची सहचारिणी, त्यांची मुलं, त्यांचे नातेवाईक, मित्र आणि देशप्रेम या सगळ्या गोष्टी त्यांच्यादृष्टीनं सर्वात महत्त्वाच्या होत्या. नाटकांच्या आणि शूटिंगच्या निमित्ताने भारतभर फिरत असले तरी आपल्या घरट्यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं. अभिनेता म्हणून बापूंच्या कामाचं मूल्यमापन, समीक्षा त्या त्या वेळी झालीच आहे. त्यांचे चित्रपट तर आजही उपलब्ध आहेत. मला स्वतःला ते जुन्या आणि नव्या नाट्यव्यवहारामधला दुवा वाटतात. त्यांनी वीर वामनराव जोशी, किर्लोस्कर, देवल, खाडिलकर, राम गणेश गडकरी यांच्यासारख्या जुन्या पद्धतीच्या नाटककारांच्या नाटकांचा आणि वसंत कानेटकर, बाळ कोल्हटकर,श्री.ना.पेंडसे, नाना करमरकर (आणि मी देखील !) अशा नव्या नाटककारांच्या नाटकांचा दुवा म्हणून काम केलं. विजया मेहता यांच्यासारख्या अद्ययावत दिग्दर्शिकबरोबर त्यांनी ''मुद्राराक्षस'' या नाटकात आर्य चाणक्याची भूमिकाही केली. दोन्ही पठडीतल्या रंगकर्मीबरोबर त्यांनी कामं केली, पण स्वतःची पठडी सोडली नाही. प्रत्येक पिढीबरोबर अभिनयाची शैली बदलत जाते. अधिकाधिक सूक्ष्म होत जाते. कारण प्रेक्षकही चाणाक्ष होत जातो. त्याच्यापर्यंत पोहचण्याच्या सुविधाही वाढत जातात. मग अभिनेत्यानं एका विशिष्ट शैलीशी चिकटून राहावं का? - हा अभ्यासाचा विषय आहे. त्याविषयी बापूंनी आपल्या ''रंगात रंगलो मी'' या आत्मचरित्रात अतिशय विस्तारानं आणि प्रामाणिकपणे लिहून ठेवलं आहे.

अभिनयदर्शनाची झलक

जाहिरातींसाठी नाटकाचं फोटोसेशन करायचं होतं. सगळ्या कलाकारांचे, त्यांच्या भूमिकेला अनुसरून फोटो काढायचे आणि मग त्याचा कोलाज करून प्रयोगाच्या जाहिरातींचं डिझाईन तयार करवून घ्यायचं असा तो प्रकार असतो. बापूंच्या फोटोच्यावेळी मी जरा गांगरलो. त्यांची व्यक्तिरेखा गुंतागुंतीची होती. त्यातला नेमका कुठला भाव फोटोत पकडावा, हेच माझ्या लक्षात येईना. मी त्यांनाच त्याच्याबद्दल विचारलं. त्यावर ते म्हणाले, "तू नुसतं सांग रे ! मी तुला हवं ते देतो...." मग मलाच काहीशी सुरसुरी आली. मी जणू त्यांची परीक्षाच घेतली. नकारात्मक भावदर्शनामधल्या अनेक भावच्छटा, एकामागून एक सांगत राहिलो. आणि तसे फोटो निघत राहिले. उदा. केवळ राग, द्वेष, मत्सर, संताप, सूड, खुन्नस,मद्याचा अंमल, वैषयिक वासना इ.इ. कॅमेरामनने एकच फ्रेम लावली होती. त्या फ्रेममध्ये हे सगळे क्लोजअपस् एकापाठोपाठ एक घेत गेलो. मध्ये अजिबात वेळ न घालवता. प्रत्येक क्लिकला भावच्छटा वेगळी. एकासारखा दुसरा फोटो नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: आई, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही... ; खाजगी व्हिडिओवरून ब्लॅकमेल झाल्यामुळे मुंबईत CA ने संपवले जीवन

Video : वाढदिवस ठरला शेवटचा..! केक कापताना घडली भयंकर घटना, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल..

कुटुंबात किती लोक? कोणत्या जातीचे आहात? आता संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या सांगू शकणार; जनगणनेत दिसणार 'हा' पर्याय

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्याने सरकार विरोधात विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

Polytechnic Admissions 2025: कोणते कॉलेज निवडू, कोणती शाखा निवडू ? पॉलिटेक्निक प्रवेशाकरिता काउंटडाऊन सुरू

SCROLL FOR NEXT