sunita tarapure 
संपादकीय

गंधगाभारा

सुनीता तारापुरे

पावसाची हलकीशी सर आली. अवकाळी, मृदगंधाचं आंदण देऊन गेली. अद्याप माणसाला कुपीबंद करता न आलेला हा सुवास. अर्थात, तो असिनोमायसेटिस नामक जिवाणूंच्या स्पोअर्समुळे येतो हे शोधून काढण्यापर्यंत आपण मजल मारली आहे, तेव्हा कुणी सांगावं उद्या असे मातीच्या सुगंधाचे स्प्रे येतीलही बाजारात. मात्र, तो असा अवचित येण्यातली गंमत हरवून जाईल. कदाचित त्यानंतरचं धुंदावणं-सुखावणंही. आईच्या ओचे-पदराचा कुशीत घेणारा वास, घराघरांमधले पोळी-भाकरी नि फोडण्यांचे भूक चाळवणारे वास, सण-समारंभातल्या नव्या कपड्यांचा कोरा करकरीत वास, ठेवणीतल्या जुन्या शालू-पैठण्यांचा मऊशार गंध, अगरबत्ती-परफ्यूम्सचा कृत्रिम सुवास, जुई-मोगरा-निशिगंधाचा मंद परिमळ, बाळाच्या जावळाचा ऊदभरला वास, ज्वारीच्या कोवळ्या हुरड्याचा किंवा भुईमुगाच्या शेंगा उपटल्यावर येणारा दुधाळ वास, जुन्या बैठ्या घरांमधला मायाळू वास, नव्या बांधकामावरचे सिमेंट-वाळूचे कणखर वास, कारखान्यांमधले नाकातले केस करपवणारे चित्र-विचित्र तीव्र रासायनिक गंध, हॉटेलांमधले चहा-कॉफीचे उत्तेजक वास, सिगरेट-गुटख्याचे उद्दाम वास... कितीतरी वास दरवळत असतात आपल्या अवतीभवती. सदोदित. दिवस-रात्रीच्या प्रत्येक प्रहराला आपला असा गंध आहे. दवभिजल्या पहाटेचा ओला वास जेवढा प्रसन्न, उत्फुल्ल करणारा, तेवढाच चांदणभरल्या रात्रीचा गंधही मत्त, धुंदफुंद! मोकळ्या रानातला, गवताळ कुरणातला, गर्द वनातला, नदीकिनारीचा, सागरतटीचा, डोंगरमाथ्यावरचा, गांवदरीतला, वाडीवस्तीवरला... प्रत्येक ठिकाणचा वास निराळा. त्याचं स्वतंत्र अस्तित्व. वेगळा चेहरा, प्रवासात क्वचित कधी, गाडी एखाद्या अडनिड्या गावापाशी थांबते. अंगणातल्या तुळस-दवण्याचा, चुलीच्या धुराचा, त्यावरल्या भाकरीचा नि खरपूस झुणक्‍याचा, गोठ्यातल्या शेणामुताचा, शेतात उभ्या पिकांचा, पाटाच्या पाण्याचा, त्यात भिजलेल्या मातीच्या ढेकळांचा, बांधावरल्या बोरी-बाभळीचा, तुरकाट्यांच्या शेकोटीचा, विडी-तंबाखूचा... आणि या सर्वांचा मिळून उसळलेला त्या गावाचा वास नाकाला बिलगतो. मनाचं अवकाश भारून टाकतो. हे गंध नाकाशीच सलगी करतात असं नाही, तर रूप-रंग-स्पर्शादी संवेदनांना चाळवत, मनात दडून बसलेल्या आठवणींना उपसत स्मरणरंजनात हरवून टाकतात. कधी पापण्या भिजवतात. कधी आतूर, कधी व्याकूळ, कधी सैरभैर, तर कधी आश्‍वस्त करतात. मनाचा गाभारा आनंदानं भरून जातो. शिगोशीग!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT