ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

Akash Deep Dedicate 10 Wickets to Sister: भारताला इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून देण्यात आकाश दीपने मोलाचा वाटा उचलला. त्याने १० विकेट्स या सामन्यात घेतल्या. ही कामगिरी त्याने त्याच्या बहिणीला समर्पित केली आहे.
Akash Deep | England vs India 2nd Test
Akash Deep | England vs India 2nd TestSakal
Updated on

रविवारी (६ जुलै) भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात ३३६ धावांनी विजय मिळवला. ऍजबॅस्टनमध्ये झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

तसेच ऍजबॅस्टनमध्ये भारताचा हा इतिहासातील पहिलाच कसोटी विजय ठरला आहे. भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात वेगवान गोलंदाज आकाश दीपचाही मोठा वाटा राहिला.

Akash Deep | England vs India 2nd Test
ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com