संपादकीय

नेतृत्वाच्या जडणघडणीला नवा आयाम 

प्रवीण खुंटे

पुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित करण्यासाठी विविध शिक्षण संस्थांमधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वाचे धडे शास्त्रीय पद्धतीने दिले जाण्याची गरज निर्माण झाली आहे. 

आज तरुणांमध्ये नेतृत्व विकासासाठी महाविद्यालयांपेक्षा महत्त्वाचे कुठलेही ठिकाण नाही. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), खेळ, कार्यशाळा, सेमीनार, कॉन्फरन्स अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना चालना मिळत असते. हे उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खुले व्यासपीठच असते. जिथे आपल्यातील क्षमतांची जाणीव विद्यार्थ्यांना होत असते. 

परंतु, नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी एवढ्याच गोष्टी पुरेश्‍या नसल्याची जाणीव निर्माण झाली आहे. राजकारणाकडे उदासीनतेने पाहणारा तरुण 2013 मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीनंतर मोठ्या संख्येने राजकीय क्षेत्रात सक्रिय होऊ लागला आहे. आम आदमी पार्टी (आप) हे त्याचेच उदाहरण. 2014 मधील लोकसभा निवडणुकी वेळी उच्च शिक्षित तरुणांनी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. यानंतर राजकीय क्षेत्राकडे उदासीनतेने पाहण्याचा तरुणांचा दृष्टिकोन बदलला आहे. परंतु, अशा वेळी कुठल्याही स्वरूपाची राजकीय, सामाजिक पार्श्‍वभूमी नाही, अशा तरुणांना राजकीय क्षेत्रात नेतृत्व करताना अडचणी येतात. हे लक्षात घेऊन याचाच विचार आणि भविष्यातील महत्त्व ओळखून महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी) महाविद्यालयात 2005 पासून राजकीय नेतृत्व विकास कार्यक्रम (पोलिटिकल लीडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) सुरू केलाय. एक वर्षाचा हा अभ्यासक्रम आता दोन वर्षांचा झाला आहे. 40 जागांच्या कोर्ससाठी देशभरातून शेकडो विद्यार्थी अर्ज करतात. त्यांची संख्या पाच पटीने वाढली आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी राजकीय क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण केले आहे. 

प्रत्येक महाविद्यालय पुढे यावे 
प्रत्येक महाविद्यालयाने नेतृत्व विकासासाठी अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. राजकारण असे क्षेत्र जे केवळ वर्गात बसून, वाचून शिकता येत नाही. यासाठी संविधान, प्रशासन, आर्थिक धोरणे, सामान्य जनतेची प्रत्यक्ष परिस्थिती एवढेच नाहीतर ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतचे संपूर्ण ज्ञान असण्याची आवश्‍यकता असते. राजकीय पक्षांची काम करण्याची पद्धत, पोलिटिकल कम्युनिकेशन, सोशल मीडियाचा वापर, निवडणुका, जाहीरनामे कसे बनविले जातात, असे विविध प्रकारचे शिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते. याचा उपयोग केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रासाठीही करता येऊ शकतो. 

देशातील राजकीय, सामाजिक परिस्थितीला समजावून घेऊन मूल्यांवर आधारित नेतृत्व विकसित करण्यासाठी शैक्षणिक संस्थांची मदत होते. असे शिक्षण केवळ राजकीय किंवा सामाजिकच नाहीतर स्वतःचे नेतृत्व करण्यासाठीही मदत करते. 
- भारतेंन्दु कुमार, राष्ट्रीय मंत्री, भारतीय जनता युवा मोर्चा 

कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नाही. केवळ या कोर्समधून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर वाटचाल करत आहे. त्याचा मला शंभर टक्के फायदा झाला. ज्या पद्धतीने कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ट्रेनिंग हवे असते, त्याचप्रमाणे राजकीय अभ्यासाचेसुद्धा आहे. 
- हेमंत ओगळे, सचिव, भारतीय युवक कॉंग्रेस 

हा राजकीय नेतृत्व विकास कार्यक्रम आहे, जो देशाचा एकमेव असा कार्यक्रम आहे जिथे राजकीय नेतृत्वाचे शिक्षणही दिले जाते आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभवही दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांना राजकीय क्षेत्रात करिअर करायचे असेल त्यांच्यासाठी यापेक्षा चांगला कार्यक्रम संपूर्ण देशात कुठेच नाही. 
- डॉ. आशिष लाल, विभाग प्रमुख, स्कूल ऑफ गव्हर्नन्स, एमआयटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT