women worker in Shell Petrol Pump on Senapati Bapat Road pune story sakal
संपादकीय

पेट्रोलपंपावरची अनोखी ‘सायलेंट शिफ्ट’

‘पेट्रोल की डिझेल’... ‘कितीचे टाकायचे?’... ‘झिरो पाहा’... ‘पेमेंट कॅश की ऑनलाइन?’... ‘चला पुढे, मागे गाड्या आहेत’...

सकाळ वृत्तसेवा

‘पेट्रोल की डिझेल’... ‘कितीचे टाकायचे?’... ‘झिरो पाहा’... ‘पेमेंट कॅश की ऑनलाइन?’... ‘चला पुढे, मागे गाड्या आहेत’... ही अशी वाक्ये कोणत्याही पेट्रोल पंपावर ऐकू येतात. वाहनांच्या हॉर्नचे आवाज यात मिसळून अधिकच गोंगाट अनुभवण्यास मिळतो. पण एखाद्या पेट्रोल पंपावर असे काहीच ऐकू येत नसेल तर? म्हणजे पेट्रोल भरणारा आणि गाडीत पेट्रोल भरून घेणारा दोघेही एक शब्दही बोलत नाहीत, पण काम मात्र अगदी सुरळीत पार पडत असेल तर...? ही गोष्ट जरा काल्पनिक वाटत असली तरी पुण्यात एके ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला मिळते.

- महिमा ठोंबरे, पुणे

पेट्रोल पंपावरचे काम हे पुरुषाचे, असे सुरवातीच्या काळात वाटले. कालांतराने महिलांच्या हाती पेट्रोल पंपाची धुरा आली तेव्हा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरले. आता त्याही पुढे जावून पाऊल टाकत दिव्यांग व्यक्ती आता पेट्रोल पंपावरील एक शिफ्ट सांभाळत आहेत, हे विशेष.

पेट्रोल पंपासारख्या गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या ठिकाणी कामाची जबाबदारी देणे जरा जिकरीचे राहू शकते. पण पुण्यात एका पंपावर हा प्रयोग झाला आणि तो यशस्वी ठरला. हे ठिकाण अन्य दुसरे तिसरे नसून पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील शेल पेट्रोल पंपचे होय.

ही गोष्ट प्रत्यक्षात येण्यामागेही एक खास कारण आहे, ते म्हणजे या पेट्रोल पंपावरील सुमारे ८० टक्के कर्मचारी हे कर्णबधीर आणि मूकबधीर (दिव्यांग) आहेत. एकूण बारा असे कर्मचारी येथे काम करत असून दिवसांतील दोन शिफ्टपैकी एक संपूर्ण शिफ्ट सगळे कर्णबधीर आणि मूकबधीर कर्मचारी सक्षमपणे सांभाळतात.

न बोलता शांतपणे पण शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे ते काम पार पडत असल्याने व्यवस्थापनाने त्यांच्या शिफ्टचे ‘द सायलेंट शिफ्ट’ असे नामकरण केले आहे.याबाबत व्यवस्थापक बिस्वा माझी सांगतात, ‘‘२०१४ मध्ये हा पेट्रोल पंप सुरू केला, त्यावेळी माझ्याकडे मूकबधीर आणि कर्णबधीर असे दोनच कर्मचारी कामावर होते.

ते फक्त टायरमध्ये हवा भरण्याचे काम करत असत. त्यांनी एकदा माझ्याकडे इतरांसारखे पेट्रोल भरणे, ऑइल चेंज करणे, पंपावरील स्टोअर सांभाळणे, असे सगळे काम करू देण्याची विनंती केली.

मला ते पटले आणि आम्ही त्यांचे प्रशिक्षण सुरू केले. ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी आम्ही त्यांना फ्लॅश बोर्ड, ऑर्डर टेकिंग बोर्ड अशा गोष्टी उपलब्ध करून दिल्या. प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामात देखील त्यांनी अतिशय उत्तम सहभाग घेतला.

विशेषतः पैशांच्या हिशोबात ते अतिशय चोख असल्याचे लक्षात आले. ग्राहकांनी देखील त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने तो विस्तारण्याचे मी ठरवले.’’ यानंतर व्यवस्थापनाने मूकबधीर व कर्णबधीर लोकांसाठी नोकरीची संधी असल्याचे सांगणारी जाहिरात केली. त्यातून अनेक व्यक्तींनी नोकरीसाठी अर्ज केला.

हळूहळू त्यांचे प्रमाण वाढत गेले असून सध्या येथील ८० टक्के कर्मचारी मूकबधीर आणि कर्णबधीर आहेत. पेट्रोल भरण्यासह, ऑइल चेंज करणे, स्टोअर सांभाळणे, गाडीतील आणि पंपावरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करणे, अशा सगळ्या जबाबदाऱ्या हे कर्मचारी सक्षमपणे सांभाळतात. शेल कंपनीचे पुणे शहरात एकूण ३३ पेट्रोल पंप आहेत. यातील अनेक पेट्रोल पंपावरही दोन किंवा तीन दिव्यांग कर्मचारी काम करतात, असे त्यांनी सांगितले.

खरंतर अनेकदा या दिव्यांग व्यक्ती धडधाकट व्यक्तींपेक्षा अधिक सक्षम वाटतात. कारण ते हुशार असतात, त्यांची आकलन शक्ती अधिक असते, असे निरीक्षण आहे. अनेक कर्णबधीर आणि मूकबधीर व्यक्ती असंघटित क्षेत्रात काम करतात. तेथे असुरक्षितता आहे. पेट्रोलपंपावरील नोकरीने संघटित क्षेत्रात काम करत असल्याने दिव्यांग कर्मचारीही समाधानी आहेत.

- बिस्वा माझी,व्यवस्थापक शेल पंप, सेनापती बापट रोड

प्रेरणादायी हातांची गाथा

माणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात प्रसंगी मार्गही दाखवितात. अशाच काही लढवय्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करत आहोत. तुमच्याशेजारी असेच लढणारे लोक असतील तर त्यांची संघर्षगाथा आम्हाला पाठवा. यासाठी फक्त एकच करायचे आहे. क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी. निवडक संघर्षगाथांना आम्ही प्रसिद्धी देऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT