पंचांग -
बुधवार : श्रावण शुद्ध ३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सकाळी ८.३६, चंद्रास्त रात्री ९.१८, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०२, मधुस्रवा तृतीया, बुधपूजन, भद्रा, भारतीय सौर श्रावण २० शके १९४३.
दिनविशेष -
१८५५ - डच जंतुशास्त्रज्ञ आणि १९२९च्या वैद्यकशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते क्रिस्तिआन आइकमान यांचा जन्म. बर्लिन येथे त्यांनी रॉबर्ट कारव यांच्यासह सूक्ष्म जंतुशास्त्राचा अभ्यास केला. कोंबड्यांना जास्त सडलेले तांदूळ खायला घातले तर त्यांना पोषक द्रव्ये कमी पडतात व त्यांच्या मज्जातंतूंना सूज येते, असे त्यांना आढळले. हे संशोधन जीवनसत्त्वाच्या अभ्यासाला आधारभूत ठरले.
१८७७ - अमेरिकन खगोलविद हॉलद्वारा मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध.
१९०८ - प्रसिद्ध क्रांतिकारक खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आले. त्या वेळी त्यांचे वय केवळ अठरा वर्षांचे होते.
१९१६ - माजी लष्करप्रमुख जनरल गोपाळराव बेवूर यांचा जन्म. परमविशिष्ट सेवा पदक व पद्मविभूषण या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. लष्करप्रमुख होणारे ते पहिले मराठी भाषक अधिकारी.
१९२८ - ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार वि. स. वाळिंबे यांचा जन्म.
दिनमान -
मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामाचा ताण जाणवेल. जिद्द वाढेल.
वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग येतील.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. शासकीय कामे मार्गी लावाल. प्रसन्नता लाभेल.
कर्क : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या : शासकीय कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक. मानसिक अस्वस्थता.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान. मित्रमैत्रिणींचे सहकार्य.
धनू : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती.
मकर : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना प्रवासाचे योग.
कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम.
मीन : कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कामे मार्गी लागतील. वाहने सावकाश चालवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.