Horoscope and Astrology
Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 जून 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी १.४१, चंद्रास्त रात्री १.५८, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.१२, महेश नवमी, भारतीय सौर ज्येष्ठ २८ शके १९४३.

दिनविशेष -

१८७७ - नामवंत शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात यांचा जन्म. शेतीमध्ये डॉक्‍टरेट मिळविणारे , शेतकी महाविद्यालयाचे प्राचार्य होणारे आणि राज्याच्या शेती खात्याचे संचालक होणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते.

१९४७ - ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकामुळे वादग्रस्त ठरलेले लेखक सलमान रश्‍दी यांचा जन्म.

१९७७ - झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.

१९८१ - ‘ॲपल’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला बहुउद्देशीय भारतीय भूस्थिर उपग्रह फ्रेंच गयानातील कोउरु अंतरिक्ष प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला.

१९९३ - नोबेल पुरस्कारविजेते ज्येष्ठ साहित्यिक सर विल्यम गोल्डिंग यांचे निधन.

१९९८ - साहित्यिक, विनोदी लेखक आणि ६४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश मंत्री यांचे निधन.

दिनमान -

मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वाहने जपून चालवावीत.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अपेक्षित गाठीभेटी होतील.

मिथुन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : कामे मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तुळ : शत्रुपिडा नाही. वाहने जपून चालवावीत. जिद्दीने कार्यरत राहाल.

वृश्‍चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.

धनु : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ : वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT