सप्तरंग

गुजरातमध्ये धक्कादायक निकाल शक्‍य

महेश शहा

राजकीय तज्ज्ञांकडून त्रिशंकू विधानसभेचाही अंदाज

अहमदाबाद : मतदानोत्तर चाचणीमध्ये भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरी प्रख्यात राजकीय तज्ज्ञ तसेच नागरी स्वातंत्र्यासाठी पीपल्स युनियन, सेव्ह डेमोक्रॅसी मूव्हमेंट यासारख्या स्वयंसेवी संस्थांनी (एनजीओ) गुजरात विधानसभेचे निकाल धक्कादायक आणि आश्‍चर्यजनक असतील, असे भाकीत वर्तवले आहे. त्रिशंकू विधानसभेचाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

गुजरातमधील वेगवेगळ्या 37 ठिकाणी 18 डिसेंबरला मतदानाची मोजणी होणार आहे. ग्रामीण भागातील मतदानाचा वाढलेला टक्का निर्णायक ठरण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. या वेळी ग्रामीण आणि शहरी असे सरळसरळ दोन भाग पडले होते. ग्रामीण भागातील 98 मतदारसंघांमध्ये सुमारे 70 टक्के मतदान झाले असून, नागरी भागात केवळ 65 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदान टक्केवारीतील हा फरकही लक्षात घेतला जात आहे.

समाजवादी गौरंग जानी यांनी सांगितले, की मला वाटते की अन्य मुद्यांबरोबरच सरकारविरोधी वातावरणही या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल. जातीय समीकरणांचाही मोठा प्रभाव राहील आणि ग्रामीण भागात आपल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले होते. नागरी भागात सर्वसाधारणपणे लोक एकत्रित मतदानासाठी गेले नाहीत; मात्र ग्रामीण भागात एखाद्या उत्सवाप्रमाणे वातावरण होते आणि गावांमध्ये तसेच समुदायाचे नेते मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी प्रयत्न करत होते.

भाजपचे प्रवक्ते यामल व्यास यांनीही नागरी भागात या वेळी मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे मान्य केले. मागील निवडणुकीत हे प्रमाण 60 टक्‍क्‍यांच्या आसपास होते; मात्र या वर्षी ते सुमारे 5 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Heat Wave: शरीरामधील उष्णतेत होते वाढ; जडतात मूळव्याध, ॲसिडिटीसारखे आजार

SCROLL FOR NEXT