murum
murum 
सप्तरंग

मुरमांचे व्रण : आधुनिक उपचार

सकाळ वृत्तसेवा

आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
मुरमांमुळे चेहऱ्यावर पडणारे काळे डाग व खोल व्रण सौंदर्याला बाधा आणतात. अशा रुग्णांना बाहेर वावरताना एक प्रकारचा न्यूनगंड जाणवतो. त्याचप्रमाणे, काही व्यक्तींमध्ये या गोष्टीमुळे पचंड मानसिक तणाव निर्माण होतो. काही वर्षांपूर्वी यावर फारच कमी उपचार उपलब्ध होते.

वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे उपचाराच्या नवनवीन पद्धती उपलब्ध होऊ लागल्या आहेत. या नवीन उपचारांच्या मदतीने आपण बऱ्याच अंशी हे व्रण कमी करू शकतो. नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण अशा रुग्णांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवू शकतो. चेहऱ्याची इतर भागातील त्वचाही यानंतर उजळते. त्वचेचा पोत बदलल्यामुळे राठपणा कमी होतो. यावर केमिकल पील्स, लेझर उपचार, बारीक सुया वापरून करण्यात येणारा डर्मारोलर उपचार, मायक्रोनीडल रेडिओफ्रिक्वेन्सी, पीआरपी थेरपी, फिलर्स असे अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत. प्रत्येक उपचारपद्धतीचे काही विशिष्ट फायदे आहेत. यात त्वचेच्या आतील थरात असणाऱ्या तंतूंना उत्तेजित केले जाते व त्यांची रचना बदलते. तयार होणाऱ्या नवीन पेशींमुळे चेहऱ्यावरील खड्ड्याची खोल कमी होण्यास मदत होते.

परंतु, यांपैकी कोणत्याही उपचारानंतर त्वचा पूर्ववत करणे शक्य नसते. पौगंडावस्थेत व त्यानंतरही मोठे फोड येणे सुरू राहते, अशा रुग्णांना वारंवार प्रतिजैविके घ्यावी लागतात. आपण केमिकल पील या उपचारपद्धतीची जोड दिली तर मोठे लालसर फोड व काळे डाग लवकर कमी होतात. हे सर्व उपचार काही आठवड्यांच्या अंतराने पुन्हा घ्यावे लागतात. सर्वसाधारणपणे तीन-चार वेळा उपचार घेतल्यास चांगली सुधारणा होते. या उपचारादरम्यान व नंतर वैद्यकीय सल्ल्याने पुढील उपचार सुरू ठेवावे लागतात. उन्हात जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. र्सौंदर्यप्रसाधनांचा वापर टाळणे हितावह ठरते. चेहरा धुतल्यानंतर हलक्या हाताने टिपून घ्यावा. घासून पुसू नये. हे सर्व उपचार तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली घेणे गरजेचे आहे.

जाहिरातबाजीला बळी पडून विनाकारण संकट ओढवून घेऊ नये. योग्य सल्ल्याने काळजीपूर्वक उपचार केल्यास निश्चितच तुमचे व्यक्तिमत्त्व उठावदार होऊ शकेल. त्याचप्रमाणे, विनाकारण होणारा मनस्ताप टळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT