MokaleVha 
सप्तरंग

#MokaleVha : मानसिक ताणांचे शारीरिक परिणाम

डॉ. अस्मिता वा. दामले, मानसोपचारतज्ज्ञ

सुमेधा रडविली, उदास अशी समोर येऊन बसली. हसतमुख, उत्साही सुमेधाला असे बघून काहीतरी बिनसले आहे, हे लक्षात आले.
‘मॅडम मला सध्या खूप अशक्तपणा जाणवतोय. चक्कर आल्यासारखे वाटते. प्रमोशन मिळाले म्हणून मी किती खूश होते. त्या आनंदात नवीन ब्रँचमध्ये जॉईन झाले. हे प्रमोशन काही मला लाभत नाहीये. म्हणून आज रजा घेऊन तुम्हाला भेटायला आले.’ 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सुमेधा शांत हो. थोडे पाणी पी. मला नीट सगळे सांग.’
‘मॅडम सतत ताण जाणवतोय. कोणतीच कामे नीट होत नाहीत, मग माझी चिडचिड होते. मग येणारा दिवस अजूनच वाईट जातो. मग नैराश्य येऊ लागते. जवळजवळ महिनाभर हेच चालू आहे.’
मी तिचे रुटीन बी.पी. चेकअप केले. सर्व व्यवस्थित होते. आता गरज होती मानसिक तपासणी व उपचारांची. यासाठी तिला अजून बोलते करायला हवे होते.

‘सुमेधा या सगळ्याची सुरुवात ब्रँच बदलल्यावर झाली का? ही ब्रँच पहिल्यापेक्षा थोडी लांब आहे का?’
‘हो मॅडम. मला आधीपेक्षा घरून लवकर निघावे लागते.’ 
‘सुमेधा लवकर उठून आवरून निघायचे, शिवाय तू ऑफिसर असल्याने आपल्याला उशीर झाला तर काय, आपल्या कामात चुका होता कामा नये, सगळ्या स्टाफबरोबर जुळवून कसे घ्यायचे या सगळ्या समस्यांचा डोंगर तुझ्यासमोर आहे.’ 
‘हो, ना. आता यातून बाहेर कशी पडू?’

‘हे बघ सुमेधा भावना निर्माण होणे हा मनुष्य स्वभाव आहे. या भावनांना तू प्रतिसाद दिलास तर तुझे दडपण, भीती वाढेल. त्याची प्रतिक्रिया म्हणून गोंधळ होणे, काम बिघडणे, चिडचिड असे क्रमाने घडेल. त्याने परत लक्षणात वाढ असे चक्र सुरू राहील.’
‘मग मी काय करू?’

‘टाईम मॅनेजमेंट, वर्क लाइफ बॅलन्स या संकल्पना प्रत्यक्षात आण. प्रथम कामांचे नियोजन कर. घर व ऑफिसमधली कामांचे अत्यावश्यक, आवश्यक, नंतर केले तरी चालेल असे वर्गीकरण कर. सुट्टीच्या दिवशी या पद्धतीने सर्व कामांची यादी कर. त्या कामांची पूर्वतयारी, लागणारा वेळ याचा आढावा घे. यामुळे रोजची धावपळ होणार नाही.’ 

‘ऑफिसमधला स्टाफ अनोळखी आहे. त्यांच्याशी कसे जुळेल असे वाटते.’
‘ब्रँचमध्ये सगळ्यांची अनौपचारिक मिटिंग बोलव. त्या सगळ्यांचे कामाच्या संदर्भातील विचार, अडचणी जाणून घे. त्यांना विश्वासात घे. वेळप्रसंगी अनुभवी, तज्ज्ञ लोकांचा सल्ला घे.’

‘हो, नक्कीच. पण मला अशक्तपणा जाणवतो व मधूनमधून चक्कर येते ते कशामुळे?’
‘सुमेधा आपला ताण, भीती शारीरिक लक्षणात प्रतिबिंबित होते. आपण न घडणाऱ्या घटनांचा (worst case scenario) विचार करून स्वतःला शिणवतो. मग चक्कर, धडधड अशी लक्षणे दिसतात. सगळ्यात आधी तुझा दृष्टिकोन बदल. प्रमोशन ही समस्या नसून ती तुला मिळालेली संधी आहे हे लक्षात घे.’
‘हो मी योग्य पद्धतीने विचार करून नियोजन करेन.’

आपण आपल्या भावनांना कसे सामोरे जातो, त्यावर परिणाम अवलंबून असतात. आपण समस्येच्या मुळात जाऊन ती निर्माण होण्याच्या कारणांचा विचार केला पाहिजे. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यावर सकारात्मक विचार केला की आपल्याकडून सकारात्मक कृती घडते व सकारात्मक परिणाम दिसतात.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT