Education
Education 
सप्तरंग

बीएएमएस, बीएचएमएस-स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंड

सकाळ वृत्तसेवा

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
राज्यातील आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शासकीय, खासगी महाविद्यालयातील बीएएमएस, बीएचएमएस शाखेतील शैक्षणिक वर्ष २०१९-२०मधील प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आयुष मंत्रालयातर्फे पूर्वीची कट ऑफ डेट ३० सप्टेंबरवरून १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशासाठी कॅप राऊंड घेतल्यानंतर मॉप अप राऊंड पहिला, त्यानंतर दुसरा, तसेच खासगी महाविद्यालयातील प्रवेशासाठी संस्थापातळीवर प्रवेश फेरी घेण्यात आली होती. अर्थातच, शासनाची शेवटची फेरी समुपदेशन पद्धतीने न घेतल्याने व नॉन जॉईनिंग झाल्यामुळे ‘बीएएमएस’ शाखेतील २१ शासकीय संस्थांमधील १०७ जागा रिक्त राहिल्या. त्यासाठी शासकीय महाविद्यालयातील या रिक्त जागांसाठी ४ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत फक्त शासकीय महाविद्यालयांतील जागांसाठी वाढीव मॉपअप राऊंड २ जाहीर झाला असून, प्रवेश ९ ऑक्टोबरपर्यंत घ्यावयाचा आहे.

स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंड
  वाढीव मॉप अप फेरी दोन नंतरसुद्धा १०७ शासकीय जागांमधून नॉन जॉईनिंगमुळे जागा शिल्लक राहणारच आहेत. पूर्वी जुलैमध्ये पसंतीक्रम भरल्यानंतर मनासारखी शाखा अथवा संस्था न मिळाल्याने किंवा पसंतीक्रम भरल्यानंतर नीट परीक्षा रिपीट करण्याचा निर्णय घेण्यातून नॉन जॉईनिंग होत होते. 

  वाढीव मॉप अप राऊंड दोनसाठी शासकीय ‘बीएएमएस’ १०७ जागा रिक्त होत्या. या जागेवर खासगी महाविद्यालयांतून प्रवेश घेतलेले व रिटेन्शन न दिलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. त्यामुळे खासगी महाविद्यालयातही ‘बीएएमएस’ जागा उपलब्ध होणार आहेतच. या फेरीसाठी ‘बीएचएमएस’ जागाही उपलब्ध होऊ शकतात. मॉप अप फेरीसाठी शासकीय ‘बीएएमएस’ १०७ रिक्त जागांसाठीची निवड यादी जाहीर केली असली, तरीही ९ ऑक्टोबरनंतर नॉन जॉईनिंगमुळे त्यापैकी काही जागा शिल्लक राहणारच आहेत. 

  स्ट्रे व्हॅकेन्सी फेरी शासकीय, शासन अनुदानित व खासगी महाविद्यालयातील ‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’ व ‘बीयूएमएस’ शाखेतील रिक्त जागांसाठी असून, संपूर्ण वेळापत्रक www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

स्ट्रे राऊंडसाठीची पात्रता
  ज्यांनी ९ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेतला आहे, असे सर्व जण या फेरीसाठी पात्र नाहीत. थोडक्यात, ज्यांनी पसंतीक्रम भरलेला आहे, परंतु या पूर्वी ज्यांना कोणताही प्रवेश मिळालेला नाही, असे सर्व विद्यार्थी पात्र आहेत. 

  या फेरीसाठी पात्र विद्यार्थी कोण याची यादी न देता या फेरीसाठी अपात्र कोण याची यादी संकेतस्थळावर ९ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. थोडक्यात अपात्र विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे, तो कोर्स, संस्था याची माहिती उपलब्ध होते. ज्यांचे नाव नॉट इलिजिबल लिस्टमध्ये आहे, त्यांना या फेरीत भाग घेता येत नाही. 

स्ट्रे राऊंड वेळापत्रक
  यापूर्वी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ज्या पद्धतीने संस्था पातळीवरील फेरी राबविण्यात आली, अगदी त्याच पद्धतीने आताची फेरी असेल. 
  रिक्त जागांचा तपशील व अपात्र विद्यार्थ्यांची यादी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहानंतर जाहीर होईल.
  www.mahacet.org संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नमुन्यामध्येच आपल्या इच्छेनुसार कोणत्याही संस्थेत वैयक्तिकरित्या अर्ज १० ते ११ ऑक्टोबर संध्याकाळी पाचपर्यंत करावा.
  संस्थेच्या नोटीस बोर्डवर व संकेतस्थळावर आलेल्या अर्जाची मेरीटनुसार यादी जाहीर होईल. तसेच निवड झालेल्यांची यादी जाहीर केली जाईल.
  प्रत्यक्ष संस्थेमध्ये १२ ते १३ ऑक्टोबर संध्याकाळी चार वाजेपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे. 
  १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहानंतर जॉइनिंग झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर होईल, त्यानंतर दुसरी निवड यादी जाहीर केली जाईल व त्यानुसार १५ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेपर्यत प्रवेश स्वीकारायचे आहेत. 
  १५ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन नंतर उर्वरित जागा मेरीटनुसार भरल्या जातील. 

अत्यंत महत्त्वाचे
शिल्लक जागांमध्ये राखीव प्रवर्गानुसार जागांची माहिती उपलब्ध होते. राखीव प्रवर्गासाठी जागा उपलब्ध नसली, तरी आपल्या गुणवत्तेनुसार राखीव गटातील विद्यार्थी खुल्या गटातून प्रवेश प्राप्त करू शकतो. या फेरीतून खासगी महाविद्यालयातून प्रवेश स्वीकारल्यानंतर शैक्षणिक शुल्क माफी मिळत ही, याची नोंद घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT