Career
Career 
सप्तरंग

आयआयएससी - बंगळूर

सकाळ वृत्तसेवा

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
आयआयएससी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स/भारतीय विज्ञान संस्था) बंगळूर ही एक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील उच्च शिक्षण देणारी भारतातील प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. शतकानुशतके संशोधनाची प्रबळ परंपरा असलेल्या या संस्थेची स्थापना १९०९मध्ये जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीतून व म्हैसूरचे राजा कृष्णाराज वडीयार (चतुर्थ) यांच्या सक्रिय पाठिंब्याने केली गेली. संस्थेला १९५८मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. संस्थेत १९३३मध्ये पहिले भारतीय संचालक म्हणून नोबेल पुरस्कार विजेते सर सी. व्ही. रमण होते. संस्था पूर्णपणे निवासी असून, बंगळूर शहराच्या मध्यभागी ४०० एकर जागेवर पसरलेली आहे. संस्थेची असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज, युनिव्हर्सिटी ग्रॅण्ट कमिशन, एआययू, ‘नॅक’शी संलग्नता आहे. भारत सरकारच्या एनआयआरएफ क्रमवारीत भारतात गेल्या सलग तीन वर्षांत या संस्थेचा विद्यापीठ श्रेणीत प्रथम क्रमांक आहे. टाइम्स जागतिक विद्यापीठ क्रमवारीत २५१, आशिया २९, ब्रिक्स १०वा क्रमांक आहे. अशा संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर जागतिक स्तरावर संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची (शंका आहे)संधी मिळते. 

संस्थेच्या स्थापनेपासून १०० वर्षांपर्यंत संस्थेत संशोधनांतर्गत बीई, बीटेक, बीएसस्सीनंतर पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमाची सोय होती. संस्थेच्या शताब्दीनंतर बारावीनंतरचा बीएस्सी रिसर्च या पदवी अभ्यासक्रमाची २०११पासून सुरवात झाली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेकडो शास्त्रज्ञ या संस्थेने दिलेले आहेत. 

शैक्षणिक कार्यक्रम
    पदवी विज्ञान (संशोधन) अभ्यासक्रम बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. कार्यक्रम आठ सत्रांत आयोजित करण्यात आला असून, अंतिम सेमिस्टर पूर्णपणे संशोधन प्रकल्पासाठी समर्पित आहे. 

    पहिल्या तीन सत्रांत वैज्ञानिक, गणित व अभियांत्रिकी तत्त्वाच्या स्तंभावर संपर्क साधला जातो. चौथ्या सेमिस्टरच्या सुरवातीला प्रत्येक विद्यार्थी स्पेशलायझेशनसाठी एक विभाग निवडतो. सातव्या सत्रात संशोधन प्रकल्प सुरू केला जातो व अंतिम सेमिस्टर पूर्णपणे प्रकल्पासाठी समर्पित केले जाते. 

    विज्ञान पदवी संशोधन कार्यक्रमात जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पृथ्वी व पर्यावरण, विज्ञान, मटेरीयल, गणित व भौतिकशास्त्र या सहा प्रमुख विषयांसाठी दिली जाते. 

पदव्युत्तर अभ्यासक्रम
    मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ डिझायनिंग, मास्टर ऑफ मॅनेजमेंट कोर्सेस उपलब्ध आहेत. एमटेक प्रोग्राम जवळपास सर्व अभियांत्रिकी विषयांत उपलब्ध आहे. दोन वर्षांचा प्रोग्राम असून, सर्वसाधारण ४०० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अभियांत्रिकीमध्ये क्लायमेट सायन्स, सिग्नल प्रोसेसिंग, नॅनो सायन्स व अभियांत्रिकी, अर्थ सायन्स, एअरोस्पेस इंजिनिअरिंग असे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम एमटेकसाठी उपलब्ध होतात. 

    इंटिग्रेटेड पीएचडी - जीवशास्त्र, रसायन, गणित, भौतिक विज्ञान या विषयांत पीएचडी करण्याची संधी बॅचलर डिग्रीधारकांना मिळते. जीवशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, फार्मसी, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी पदवीधर यामधील बीएस्सी डिग्री व जाम परीक्षेचा स्कोअर पात्रतेसाठी आवश्यक असतो. 

ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानातील उच्चशिक्षण घेण्याची इच्छा आहे, अशांसाठी ही सर्वोच्च संस्था आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील अग्रगण्य अशा या संस्थेत प्रवेश करण्याची संधी प्राप्त होऊ शकते, मात्र पदवी प्रवेशासाठी तसेच पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असते. संस्थेतील अभ्यासक्रमाचा आवाका खूपच प्रचंड आहे. त्यामुळे संस्थेच्या www.iisc.ac.in या संकेतस्थळास संपर्कात राहावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT