Career
Career 
सप्तरंग

ऑनलाइन फॉर्म भरताना फोटोबाबतच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक 
देशभरातील तसेच राज्यातील आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, कृषीसह कोणत्याही शाखेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट, जेईई, एमएचटी सीईटी परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म उपलब्ध होतात. यामध्ये रजिस्ट्रेशन, अॅप्लिकेशन फॉर्म भरणे, इमेज अपलोडिंग, फी पेमेंट व कन्फर्मेशन पेज प्रिंट घेणे हे टप्पे असले तरी, यापैकी इमेज अपलोडिंग हाच महत्त्वाचा टप्पा आहे. 

फोटोचे महत्त्व
       या संपूर्ण प्रक्रियेत फोटोबाबत दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे. नीट २०१९ परीक्षेला देशभरातून १४.११ लाख तर राज्यातून २. लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. वैद्यकीय साठीची नीट परीक्षा ही अत्यंत संवेदनशील असल्याने ओळख पटविण्यासाठी फोटो हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. 

       नीट परीक्षा स्वतंत्रपणे नेमलेल्या नॅशनल टेस्टिंग बोर्डातर्फे घेतली जाते. ही परीक्षा झाल्यानंतर निकाल जाहीर झाला, त्यानंतर प्रवेश झाले आणि त्यानंतर आता तामिळनाडू नीट प्रवेश घोटाळा नुकताच उघडकीस आला. तमिळनाडू विद्यार्थ्यांनी राज्याबाहेर केंद्र निवडणे,  तोतया विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. म्हणून फोटो अत्यंत महत्त्वाचा असून, त्याबाबतच्या नियमांचे पालन करावे. 

फोटोबाबत महत्त्वाचे 
       फोटो हा पासपोर्ट आकाराचा (३५ बाय ४५ मिमी) आकाराचा असावा. फोटोमध्ये चेहरा हाच महत्त्वाचा भाग असल्यामुळे आकाराने चेहऱ्याचा भाग पासपोर्ट फोटोप्रमाणे कमीत कमी सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फोटो खूप मोठा, परंतु चेहरा अतिशय लहान असा फोटो रिजेक्ट होऊ शकतो.

       फोटो नियमानुसार रंगीत अथवा कृष्णधवल चालू शकतो. मात्र आपला फोटो रंगीत काढणेच उत्तम ठरते. रंगीत फोटोची पार्श्‍वभूमी अजिबात भडक नसावी. फोटो सुस्पष्ट व समोरून घेतलेलाच  असावा. मान जास्त खाली किंवा वर न करता समोर नजर असावी. 

       आपणास नेहमी चष्मा असेल, परीक्षेला चष्माच वापरणार असाल तर चष्मा घालूनच फोटो काढणे आवश्यक आहे. चष्मा न घालता फोटो अपलोड केल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर परीक्षेला जाताना मात्र ‘फॉर्म भरल्यानंतर चष्मा लागला’ असे डॉक्टरांचे प्रमाणपत्रे घेऊन परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी असतात. असे न करता चष्मा घालूनच फोटो काढा. 

       टोपी, गॉगल घालून फोटो काढू नये. फोटोसाठी नियमित पोशाख घालावा. गणवेश प्लेन असावा. त्यावर लिखाण, चित्रे नसावीत. विद्यार्थ्यांनी टाय वापरून फोटो काढू नयेत. 

प्रत्यक्ष फोटो काढताना
       स्टुडिओमध्ये फोटो काढताना तो पूर्ण मेगापिक्सलचा काढावा व पासपोर्ट आकाराच्या फोटोच्या डझनभर प्रती त्या वेळीच काढाव्यात व पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी जपून ठेवाव्यात.

       मागील अनेक वर्षे फोटो काढताना त्या खाली विद्यार्थ्याचे नाव व फोटो काढल्याचा दिनांक टाकणे आवश्यक होते, सद्यःस्थितीत जेईई, नीट व एमएचटीसीईटीसाठी फोटोखाली नाव, फोटो काढल्याचा दिनांक किंवा जन्मतारीख टाकण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात परीक्षेचे माहितीपत्रक आल्यानंतर त्यातील सूचनांचे पालन करावे. 

       आजच फोटो काढावयाचा असल्यास फोटो काढण्यास हरकत नाही. त्याखाली नाव टाकू नये. भविष्यात नावाची, दिनांकाची आवश्यकता भासल्यास आपण संगणकावर त्याखाली टाकू शकतो. 

       आपला फोटो काढताच तो पेन ड्राइव्ह वर घ्यावा. प्रत्यक्षात फोटो अपलोड करताना सर्वसाधारणपणे दहा केबी ते दोनशे केबीच्या आकारात असावा लागतो. आपल्या पूर्ण आकारातील फोटोचा आकार स्कॅन करताना योग्य त्या केबीमध्ये करून जेपीईजी फॉर्मेटमध्ये सेव्ह करावी.

       आवश्यकतेपेक्षा अधिक केबी आकार झाल्यास इमेज अपलोड होत नाही व आकार कमी केबी झाल्यास इमेजेस स्पष्ट दिसत नाहीत. 

थोडक्यात फोटो हा परीक्षा देतानाचा अत्यंत महत्त्वाचा ओळखीचा पुरावा असल्यामुळे विद्यार्थी, पालकांनी त्याचे पालन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT