प्रकाश भिसे यांनी लॉकडाऊन काळात रेखाटलेल्या कलाकृती.
प्रकाश भिसे यांनी लॉकडाऊन काळात रेखाटलेल्या कलाकृती. 
सप्तरंग

रंगसंवाद : जगण्याचा सामूहिक संघर्ष

महेंद्र सुके

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच, तो कधीकधी सामूहिकही होतो, याची प्रचिती कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात आली. समूहाने राहणाऱ्या, गर्दीत वावरणाऱ्या माणसावर आपापल्या घरात, आपल्याच प्रदेशात बंदिस्त होण्याची वेळ आली. सारेच ठप्प झाले. प्रश्‍न वाढले. प्रत्येकाला चिंता वाटायला लागली. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी घराबाहेर पडायचे नाही. कामावर जायचे नाही; मग जगायचे कसे, हा प्रश्‍न हातावर पोट असणाऱ्यांपासून रोजगार करणाऱ्यांपर्यंत आणि रोजगाराची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांपर्यंत साऱ्यांनाच सतावत होता. घरात बंदिस्त झालेल्यांचे प्रश्‍न घराबाहेर डोकावू लागले आणि मन सैरभैर होत गेले.

शहरांत कामधंदा मिळणार नाही, याची जाणीव होताच माणसांना आपापल्या गावांची ओढ लागली; पण तिकडे जाण्याची साधनं बंद. अशात काफिलेच्या काफिले मुंबईसारख्या महानगरातून चालत निघाले. कुणी जे साधन मिळाले ते जवळ करू लागले. स्थलांतर. यात असंख्य समस्या, अडचणी आल्या. कुणाचे रोजगार गेले, कुणी उघड्यावर आले. लॉकडाऊनने प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. याच संघर्षांचे वास्तववादी रेखाटन मुंबईतील ज्येष्ठ चित्रकार प्रकाश भिसे यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रकाश भिसे यांचे बालपण खेड्यात गेले. त्यांच्या आजीने त्यांना प्लेगच्या साथीत त्यांच्या कुटुंबीयांतील एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याची गोष्ट सांगितली होती, ती आठवली. एका साथीच्या आजारात आपल्या पूर्वजांच्या वाट्याला आलेल्या दु:खाशी परिचित असणारे भिसे कोरोना साथीचे समाजमनावर पडणारे पडसाद संवेदनशील कलावंत म्हणून न्याहाळत होते. ते त्यांच्या चित्रातून मांडत होते. शहर सोडून निघालेले भुकेलेल्या असहाय्य नजरा, रस्त्यावरून ओझे घेऊन जाणारी माणसे, कामाठीपुरा खेतवाडीमधील स्त्रियांचे जगणे, बंद असणारी लग्न कार्यालये, दुकाने अन्‌ रस्त्यावर फिरणारी अतिरेकी वाटणारी माणसे भिसे यांनी त्यांच्या चित्रात रेखाटली.

माणसाच्या जगण्याशी नाते जोडणारे संवेदनशील चित्रकार प्रकाश भिसे यांनी त्यांचे कलाशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधून केले आहे. रहेजा कला महाविद्यालयात प्राध्यापकी केली आहे. राज्य पुरस्कारांसह अनेक संस्थांनी त्यांच्या चित्रकलेच्या कार्याचा गौरव केला आहे. जहांगीर कलादालनांसह वेगवेगळ्या शहरांत त्यांच्या चित्रांचे आजवर अनेकदा प्रदर्शने भरली आहेत. त्यांच्या चित्रकलाकृती अनेक महत्त्वाच्या दालनांत संग्रहित असून, लॉकडाऊन काळात त्यांनी रेखाटलेली असंख्य चित्रे माणसाच्या जगण्याचा सामूहिक संघर्ष सांगणारी आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT