maths
maths 
सप्तरंग

​"छे...मला गणित अजिबात जमत नाही!'

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक

बालक-पालक

"मला गणित अजिबात जमत नाही,' असं जेव्हा मुलगा जाहीर करतो तेव्हा बहुसंख्य पालकांना ते अजिबात पटत नाही. हलकासा धसका किंवा धक्काच. त्यांचंही बरोबरच असतं. "गणित' तसं महत्त्वाचं असतंच.

अनेक अभ्यासक्रमांसाठी ते अनिवार्य असतं, पण तो पुढचा विचार सोडला, तरी शाळेत तर गणित टाळता येत नाही. ते "अजिबात जमलं नाही,' तर कसं चालंल? बहुतेक पालक अशा वेळी "गणित येणं कसं आवश्‍यक आहे,' याच्यावर अगदी मुद्देसूद लेक्‍चर देऊ लागतात. काहीजण त्याचं गणित कसं सुधारता येईल, असा विचार करू लागतात. "क्‍लास लावण्या'च्या पर्यायाचाही विचार होतो. हे सगळं योग्यच असतं...पण ते नंतर! प्रथम "आपल्याला गणित अजिबात जमत नाही,' या विचारामुळं मुलाची जी मनःस्थिती झाली आहे, तिची दखल घेणं गरजेचं असतं. "तुला काय वाटतंय ते राहू दे, गणित सुधारायचं कसं ते बघू' हा सडेतोड दृष्टिकोन उपयोगाचा नसतो. थोडं त्याला समजून घ्या, त्याला बोलतं करा.

"हं...गणित जरा अवघडच विषय असतो...निदान तसा वाटतो तरी', "काहींना गणित जड जातं खरं... ऍक्‍च्युअली बऱ्याच जणांना,' असं बोलल्यामुळं संवाद सुरू होतो. मुख्य म्हणजे "आपल्याला गणित हा विषय अवघड जातो, हा काही आपला गुन्हा नव्हे.' अशा विचारानं मुलगा थोडा शांत होतो, आश्‍वस्त होतो. "गणितात कमी गुण मिळाले तर आईबाबा काय म्हणतील,' याविषयीची त्याची धास्ती कमी होते. मग "एकदा रीत समजून घेतली, की गणितं पटापट सुटतात. प्रॅक्‍टिस केली तर गणित जमू शकतं. तू जितकी गणितं सोडवशील, तितकं तुला सोपं जाईल. मी करेन तुला मदत,' असा "सल्ला' दिला तर तो "ऐकला' जातो. "खरं तर गणित सोपं करून शिकवण्याचंही तंत्र आहे. आपण त्याची माहिती मिळवू या,' हा दिलासा तर सर्वांत उत्तम.

तात्पर्य : प्रतिक्रिया किंवा सल्ला देण्यापूर्वी मुलाची मनःस्थिती समजून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

2024 च्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मधून घेणार निवृत्ती- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT