Education
Education 
सप्तरंग

आधी प्रभुत्व मराठीवर, मग इंग्रजीवर!

शिवराज गोर्ले

बालक-पालक
हे तर कुणीही मान्य करेल, की कुठलीही गोष्ट नैसर्गिक, सुयोग्य पद्धतीनं अधिक चांगली आत्मसात करता येते. मग ‘भाषा’ त्याला अपवाद कशी ठरेल? त्यासाठी अगोदर ‘भाषा’ म्हणजे काय, ती शिकली जाते म्हणजे नेमकं काय घडत असतं, हे समजून घ्यायला हवं.
भाषा बनत असते शब्दांनी. शब्द म्हणजे ध्वनी. खरं तर ‘ध्वनिप्रतीकं’ असतात. त्यासाठी आपण नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा या पाचही ज्ञानेंद्रियांचा, म्हणजे त्याद्वारे होणाऱ्या ‘आकलना’चा वापर करत असतो. उदा. आंबा म्हटलं, की त्याचा आकार, रंग, वास, चव, स्पर्श (मऊ वा टणक) अशा साऱ्या संवेदना एकत्र येऊन आपण आंब्याची परीक्षा करतो.

आपल्या अनुभवातून हळूहळू प्रत्येक वस्तू व प्राणी इत्यादींबद्दल अधिकाधिक संवेदना एकत्रित येऊन आपलं ज्ञान विकसित होत जातं व त्यातून तयार होणारा ‘संघटित’ अर्थ भाषेतील प्रत्येक शब्दामागं मनात वा मेंदूत जोडला जातो. या संघटित अर्थाला संबोध किंवा संकल्पना (कन्सेप्ट) म्हणतात.

भाषेतील शब्द ही मुळात ‘ध्वनिप्रतीकं’ असली, तरी ती अशा संकल्पनांची प्रतीकं बनतात. आपण जाणीवपूर्वक बोलत वा ऐकत असताना आपल्या पूर्वानुभवातून आवश्‍यक त्या स्मृती जागृत होतात. बोलताना योग्य स्मृती जाग्या व्हाव्या लागतात, तशा त्या झाल्या नाहीत, तर आपल्याकडून शाब्दिक चुका होतात. आपण मराठीत वाक्‍य बोलतो, तेव्हा आपल्या मनात शब्दांमागच्या अर्थरूप संकल्पनांची जुळणी होते. म्हणजेच, आपल्या मातृभाषेतल्या अर्थयुक्त ध्वनिप्रतीकांची एकत्र गुंफण होते. ती करत असताना सलग व सुसंगत अर्थ तयार व्हावा, यासाठी आपण त्या ध्वनिप्रतीकांची, म्हणजे शब्दांची रूपं बदलतो. म्हणूनच मूळ नाम व क्रियापदाची रूपं वेगवेगळा अर्थ सांगताना बदलली जातात. ही रूपं कशी बदलायची, याची प्रत्येक भाषेची पद्धत वेगळी असते. आपल्या मातृभाषेतील रूपं बदलांची पद्धती म्हणजे व्याकरण, आपण शालेय शिक्षणातून सविस्तर समजून घेतो, पण ती पद्धती केवळ मराठी भाषेचं व्याकरण शिकून मनात रुजत नसते. इतरांशी बोलताना व ऐकताना त्यांचा वापर झालेला असतो. ही झाली भाषा शिकण्याची, तिच्या विकासाची नैसर्गिक व सुयोग्य पद्धत. मात्र, मराठी मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिल्यास नेमकं काय घडतं? पाहू पुढील भागात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT