Education
Education 
सप्तरंग

तुमचं वर्तन ‘अनुकरणीय’ आहे काय?

सकाळवृत्तसेवा

बालक-पालक
मुलांवर योग्य ते संस्कार करण्याची, त्यांच्यामध्ये योग्य मूल्य रुजविण्याची जबाबदारी पालकांवर असते. पालकही ती नाकारत नाहीत. पण मुळात ‘मूल्य’ म्हणजे नेमकं काय?

एक सोपी व्याख्या अशी आहे ः चांगल्या वर्तनाची प्रेरणा देतं ते मूल्य. हवं तर नैतिक वर्तनाला उद्युक्त करतं ते मूल्य, असंही म्हणता येईल. आता प्रश्‍न येतो, तो ही मूल्यं रुजवायची कशी? मुलांवर चांगले संस्कार करायचे कसे?

त्यासाठी अर्थातच मुलांसमोर चांगली उदाहरणं हवीत, चांगले आदर्श हवेत. असे आदर्श मुलांच्या पाठ्यपुस्तकातही असतात. पण मुलांना प्रथम हे सांगायला हवं, की हे आदर्श पुस्तकापुरते नसतात. अशा ‘धड्यां’मधून जी चांगली तत्त्वं, जे आदर्श वागणं मुलांसमोर येतं, ते फक्त लक्षात ठेवून परीक्षेत उतरवण्यापुरतंच राहतं. नकळत पालकही मुलांच्या त्या समजालाच पुष्टी देत असतात.

आदर्श तर अवतीभवतीही असतात, मोठे तसेच छोटेही. बिल गेट्‌स, नारायण मूर्ती, सचिन तेंडुलकर, प्रकाश बाबा आमटे... यांच्या इतकं मोठं होता आलं नाही, तरी त्यांच्याकडून तुमच्या मुलांनाही काही ना काही घेण्यासारखं, शिकण्यासारखं असतं. तसं काही तुम्ही मुलांना सुचवता का? त्यांच्याशी बोलता का?

‘मूल्यां’ची गंमत अशी, की ती थेट शिकवता येत नाहीत. व्हॅल्यूज कॅनॉट बी टॉट डिरेक्‍टली. मूल्यांचे काही घास भरवता येत नाहीत, की (उपदेश करीत) त्यांचे डोस देता येत नाहीत. केवळ ‘असं करू नये’सारख्या नकारातूनही मूल्यं देता येत नाहीत. जमिनीत पाणी झिरपावं, तशी ही मूल्यं निरीक्षणातून मनात झिरपत जातात. मूल्य नेहमीच हळूहळू उचलली जातात, रुजवली जातात. प्रथम निरीक्षणांतून उमजलेली मूल्यं विचारांतून, अनुभवांतून पक्की होत जातात. पालकांच्या वागण्या/बोलण्यातून मुलं ती उचलत, शिकत असतात. फक्त मुलांसमोरच नव्हे, तर मुलांच्या पश्‍चातही पालक जसं वागतात, त्यातून योग्य/अयोग्य काय हे मुलांच्या मनावर बिंबवलं जात असतं. म्हणजे इथं पालक भूमिका बजावतात, ती स्वतःच्या वर्तनातून. ते नैतिक, अनुकरणीय ठेवून. तुमच्या मुलांनी जसं व्हावं, वागावं असं तुम्हाला वाटतं, तसं तुम्ही स्वतः वागता का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT