Edu
Edu 
सप्तरंग

शिक्षणात बदल व्हायलाच हवा

सकाळ वृत्तसेवा

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांना आज शाळांमधून जे शिक्षण दिलं जातं आहे, त्याचं स्वरूप बदलायला हवं, यावर आता साऱ्यांचंच एकमत होतं आहे. हे सारे म्हणजे कोण? योग्य शिक्षण कोणतं, हे ठरविणार कोण? तर ते म्हणजे विचारवंत, मानसतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ. शास्त्रज्ञ, साहित्यिक... हे नेहमी समाजाच्या भवितव्याचा, प्रगतीचा विचार करत असतात. समाजाचा विकास व्हायचा असल्यास उद्याची पिढी चांगली घडायला हवी, म्हणजेच आज मुलांना दिले जाणारं शिक्षण त्यांचा सर्वांगीण विकास घडवणारं, त्यांना शहाणं, विचारी, सुसंस्कृत, सर्जनशील होऊ देणारं असायला हवं. या सर्व दृष्टीनं हे सारे बालशिक्षणापासूनच बदलाची दिशा सुचवत आहेत. पण हे बदल नेमके कशासाठी, हे पालकांनाही कळणं, ते मनोमन पटणं आवश्‍यक आहे.

पालकांच्या सुजाण सहभागाशिवाय हे बदल शक्‍यच होणार नाहीत. पण पालकांची मानसिकता सहजासहजी बदलणंही शक्‍य नाही. त्यासाठी प्रथम पालकांनाच खूप काही शिकावं लागणार आहे. त्यासाठीच हा प्रयत्न... 
पालकांना हे माहितीच आहे की, इटलीच्या मॉंटेसरी मादाम यांनी मुलांच्या मेंदूचा होणारा विकास, विकासाची गती व क्रम यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यानुसार बालशिक्षणाची शास्त्रीय पद्धत बनवली. पंच ज्ञानेंद्रिये हीच ज्ञानाची द्वारे आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्या विकासावर भर दिला.

बालस्वातंत्र्य, खेळातून शिक्षण, शिक्षणात खेळ, अनौपचारिक शिक्षण, कृतियुक्त व अनुभव आधारित समाज शिक्षण यावर लक्ष केंद्रित केलं. 
जागतिक स्तरावर व आपल्याकडेही बालशिक्षणात बदल होत गेला, मात्र ही पद्धती प्राथमिक शिक्षणात येऊ शकली नाही. तिथे ब्रिटिशांनी घालून दिलेली वॉटरसन वर्तनवादी शिक्षण प्रणालीच चालू राहिली. साचेबंद पाठ्यक्रम, मूल्यमापनाचे ठरावीक मापदंड, ‘घोका आणि ओका,’ स्वातंत्र्यानंतरही ती अशीच राहिली. 

रजनी दाते म्हणतात त्याप्रमाणे बालशाळा या प्राथमिक शाळांच्या लेखन-वाचनाची तयारीसाठी असतात, अशी समजूत झाली. बालमंदिराचे पेव फुटले; पण ते शास्त्रीय. पद्धतीने बालशाळा चालविण्यासाठी नव्हे, तर व्यापारी तत्त्वावर? हे चित्र बदलण्याची नितांत गरज होती. कोणकोणते बदल, कसेकसे होत गेले हेच यानंतर आपण समजून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT