Education
Education 
सप्तरंग

मुलांचं मुक्त आकाश जपण्यासाठी... 

सकाळ वृत्तसेवा

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांचं मुक्त अवकाश जपणारी शाळा हा अभिजित सोनावणे यांचा ‘नव्या दिशा’मधील लेख वाचनात आला आणि कौतुक, आश्‍चर्य, गंमत... खूप काही वाटून गेलं. पठडीबद्ध शिक्षणापेक्षा मुलांना काही वेगळ्या मार्गानं शिक्षण दिलं पाहिजे. खरं तर शिकू दिलं पाहिजे या ध्यासानं झपाटलेले योगेश कोडोकीकर आणि प्रेरणा गुप्ता पुण्यात एक अनोखा प्रयोग करताहेत. इकोट्यूड हा तो प्रयोग. इकोट्यूड म्हणजे इकोलॉजिकल ॲटिट्यूड! 

अगदी मोजक्‍याच मुलांसह हा प्रयोग म्हटलं तर ही शाळा सुरू झालीय. यातला पहिला विद्यार्थी म्हणजे खुद्द कोडोलीकर यांचा मुलगा. काय आहे इकोट्यूडमागची कल्पना? ती थोडक्‍यात अशी आहे- लहान वयात मुलांमध्ये अपरिमित ऊर्जा असते, प्रचंड उत्सुकता असते की ते काय ॲब्सार्ब करेल, कोणत्या वयात काय शिकेल हे ठरवता येत नाही. साचेबद्ध शिक्षणात समोर शिकवलं जाईल तेवढंच त्यांनी शिकणं अपेक्षित असतं. यातून त्यांची ऊर्जा वापरली जात नाही. त्यांची ऊर्जा वापरण्यासाठी- उत्सुकता निर्माण करण्याचं आणि ती शमविण्याचं अवकाश त्यांना दिलं तर मुलं अनेक गोष्टी विलक्षण वेगानं आत्मसात करतात. त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना व्यक्त होऊ दिलं पाहिजे... हे अवकाश कसं दिलं जातं? 

या शाळेत बाहेर फिरण्याला, स्वतः कुठे जाऊन गोष्टच अनुवण्याला आणि त्याचं आकलन स्वतःचं स्वतः करण्याला खूप महत्त्व असतं. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळात मुलं इथं येतात. बहुधा दिवस खेळण्यानंच सुरू होतो. तास नाही, परीक्षा नाही, अमुक एक गोष्ट आता शिकलीच पाहिजे असं बंधन नाही. शाळेच्या आवारात खूप सारी खेळणी आहेत म्हणजे लाकडांचे तुकडे... या तुकड्यांपासून प्रत्येक जण आपापलं खेळणं तयार करतं. नवा आकार करायचा, मोडायचा पुन्हा नवं काही तरी बनवायचं... ठरीव कार्यक्रम नसतो. मात्र पावसाळा, हिवाळा, उन्हाळा तिन्ही ऋतूंत मुलांना २१ दिवसांची सुट्टी मिळते. सुट्टीत मुलांनी गावी जायचं प्रत्येक ऋतू, निसर्गातले बदल प्रत्यक्ष अनुभवायचं... शाळेत परतल्यावर मनात साचलेलं वेचलेलं व्यक्त करायचं. कागदावर, भिंतीवर, फरशीवर हवी तिथं चित्रं काढायची... मुलं उत्तम सिनेमे पाहतात, लिहितात, वाचतात, खेळतात, भांडतात. त्यांना जे जे हवं, ते ते करतात. स्वतःचं एखाद्या प्रक्रियेचा अर्थ लावू पाहतात... या सर्व उपक्रमात कोलर्नर, फॅसिलिटेटर म्हणून योगेश - प्रेरणा त्यांच्यासोबत असतात.. हे आहे या प्रयोगाचं शाळेच्या प्रयोगाचं वर्तमान. भवितव्य काय असेल ते अर्थात काळच ठरवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT