All-Is-Well
All-Is-Well 
सप्तरंग

मनाच्या पाच लयी...

सकाळ वृत्तसेवा

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
प्राचीन पातंजली योगसूत्रामध्ये मनाच्या पाच लयींचा उल्लेख केला आहे. त्यापैकी प्रमाण किंवा पुरावा हा पहिला होय. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा पुरावा हवा असतो. आपण प्रेम, सत्य किंवा कुणाचा तरी प्रामाणिकपणा मागतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट सिद्ध करायची असते. मनाची दुसरी लय म्हणजे विपर्याय होय. विपर्याय म्हणजे आपल्या मनाने काढलेला चुकीचा निष्कर्ष किंवा गैरसमज. या माध्यमातून मन स्वतःचे विश्‍व तयार करते. हे विश्‍व वास्तवापासून अतिशय वेगळे असते.

अवास्तव किंवा काल्पनिक गोष्टीला खरे मानणे, तसेच खऱ्या, वास्तव गोष्टीला खोटे मानणे म्हणजे विपर्याय आहे. त्याचप्रमाणे विपर्याय बाळगणारे मन तात्पुरत्या, क्षणिक किंवा नाशवंत गोष्टीकडे शाश्‍वत म्हणून पाहते. याचे एक साधे उदाहरण देता येईल. तुम्ही कोणाच्या तरी घरामध्ये जात आहात आणि घरातील व्यक्तींनी तुम्हाला घरात प्रवेश करताना पाहिले नाही. त्याचवेळी वाऱ्याचा जोरदार झोत आला किंवा घरात पाल घुसत असल्याचे पाहून घरातील व्यक्तींनी दार बंद केले. मात्र अशावेळी तुम्ही आपल्या चेहऱ्यासमोर दार बंद केले, असा विचार करता. मनाची तिसरी लय म्हणजे विकल्प होय. विकल्प म्हणजे कल्पना.

या प्रकारात मन पुन्हा अजिबात अस्तित्वातच नसलेल्या गोष्टींचा विचार करते. कल्पनेच्या भराऱ्या घेते. निद्रा किंवा झोप ही मनाची आणखी एक लय आहे. स्मृती ही मनाची शेवटची लय. मन स्मरणशक्तीवर एक प्रकारे अवलंबून राहते. ते सर्वकाळ भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करत राहते. आपण मनाच्या या पाचही चुकीच्या लयींपासून स्वतंत्र व्हायला हवे.

मन भूतकाळ आणि भविष्यकाळात हेलकावे खात राहिले तर मनःशांती कशी मिळणार? आपण मनाला वर्तमान क्षणात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यानंतरच ते आनंदी होईल. हे प्राणायामाच्या माध्यमातून शक्य आहे. त्याचप्रमाणे प्राणायामाला सर्वकाही घडतेय, ते सत्य नसून एक प्रकारचे स्वप्नच आहे, याची जाणीवही हवीच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT