Sri Sri Ravishankar
Sri Sri Ravishankar 
सप्तरंग

यशाची पाच गुपिते (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर

इनर इंजिनिअरिंग

यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. यश ही एक वृत्ती असते, घटना नसते. प्रत्येक व्यवसाय आणि संस्थेत परिस्थिती हाताळायचे कौशल्य तुमच्यात असावे लागते. आपल्या आतून ते येते. या आतल्या जागेला मी आध्यात्मिक म्हणतो. यश मिळविण्यासाठी पाच गोष्टींची गरज असते.

1. अनुकूल वातावरण : शांतता आणि भरभराट या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. अस्वस्थ वातावरणात भरभराट होऊ शकत नाही. इतरांबरोबर काम करतानाही तुम्हाला संघभावनेने काम करावे लागते. तुमच्या गटातील सर्वांशी आदराची भावना ठेवा आणि इतरांवर खापर फोडण्याच्या भानगडीत अडकू नका. आणखी एक म्हणजे गटाच्या नेत्याने उत्साहाचे, विश्‍वासाचे, सहकार्याचे आणि आपलेपणाचे वातावरण ठेवावे. लोकांच्या मनात आतूनच स्फूर्ती निर्माण करणे हीच सर्वांत परिणामकारक क्‍लृप्ती आहे.

2. कामातील कौशल्य : कर्माच्या फळाशी गुंतून न राहणे, हेच भगवद्‌गीतेचे सार आहे. एखाद्या युद्धजन्य परिस्थितीत तुम्ही तुमच्या मनाला सावरू शकत असल्यास तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सांभाळून घेऊ शकता. कर्माच्या या कौशल्याला योग म्हणतात. योगाच्या या कौशल्यामुळेच उद्धटपणा आत्मविश्‍वासात, लीनता नम्रतेत, परावलंबित्व परस्परावलंबनाची जाणीव होण्यात परिवर्तित होतो. तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने 100 टक्के द्या.

3. सिंह होणे : सिंहासारखे धैर्य असलेल्यांकडे मोठी संपत्ती चालून येते. श्‍वासाइतकेच आस्था आणि वैराग्य हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. तुम्ही श्‍वास आत घेता पण तो जास्त काळ आत रोखून धरू शकत नाही, तुम्हाला तो बाहेर सोडावाच लागतो. त्याचप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला आस्था असावी लागते, तसेच सोडून देण्यासाठी वैराग्य असावे लागते. तुम्हाला भरभराटीची हाव नसते, तेव्हाच ती तुमच्याकडे चालून येते.

4. नशिबाचा एक अंश : सुबत्ता प्राप्त होण्यासाठी केवळ स्वतःच्या मेहनतीची गरज असल्यास खूप मेहनत करूनही भरभराट होत नाही, असे अनेक लोक आहेत. ही अगम्य गोष्ट किंवा नशीब अध्यात्माने उचलून धरले आहे. सगळी भौतिक सृष्टी, लहरींच्या एका सृष्टीने चालते, जी आपल्याला दिसते त्यापेक्षा सूक्ष्म असते. अध्यात्मामुळे बुद्धीला आणि अंतर्ज्ञानाला धार चढते.

5. ध्यान : तुमच्या जबाबदाऱ्या आणि ध्येय जेवढे मोठे, तेवढे तुम्हाला ध्यान करण्याची अधिक गरज आहे. आजच्या काळात मनावरचा ताण, समाजातील तणाव कमी करण्यासाठीही ध्यान करावे लागते. तुम्ही तुमच्या कामाचा भारही कमी करू शकत नाही आणि वेळही वाढवू शकत नाही. पण तुम्ही तुमची शक्ती, ऊर्जा वाढवू शकता. ध्यानामुळे तुमचा ताणतणाव नाहीसा होतो, इतकेच नाही तर तुमच्या क्षमताही वाढतात. तुमची मज्जासंस्था आणि मन बळकट होते. शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT