सप्तरंग

थॉट ऑफ द वीक : स्वप्नाला खरंच ‘ध्येय’ बनवायचंय?

सुप्रिया पुजारी

ईशा शाळेत असताना एक चित्रपट पाहायला गेली. चित्रपटामधील मुख्य व्यक्तिरेखा एका महिला डॉक्टरची होती. त्या भूमिकेचा ईशावर एवढा प्रभाव पडला, की तिलाही डॉक्टर व्हावेसे वाटले. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विज्ञान विषय घेऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व अभ्यास सुरू झाला. तिच्या शाळेतील मैत्रिणीने आर्ट्‌स विषय निवडला होता. तिचे विविध कार्यक्रम, सूत्रसंचालन, संगीत, नृत्य यातील अभ्यास; तसेच इव्हेंट मॅनेजमेंट पाहून ईशालाही आर्ट्‌स घ्यावे असे वाटले; पण उशीर झाला होता. डॉक्टर होण्याचे स्वप्न मागे पडले. विज्ञान विषयामध्ये पदवी मिळाल्यानंतर तिने इव्हेंट मॅनेजमेंटचा एक कोर्स केला; पण काही कारणास्तव तिला ते जमेना. असेच अनेक महिने गेले, ईशा मात्र रोज वेगळ्या गोष्टींमुळे प्रभावित होऊन एक नवीन स्वप्न पाहायची व त्यालाच ध्येय मानायची. परिणामी, कुठेच पूर्ण लक्ष केंद्रित होत नव्हते. आज तिला एकच प्रश्न सतावत आहे, ‘‘माझे कोणतेच स्वप्न का पूर्ण होत नाही?’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ईशासारखे आपणही स्वप्न पाहतो व त्या दिशेने वाटचाल सुरू करतो. आपले स्वप्न हेच आपले ध्येय बनते; पण त्या ध्येयपूर्तीची वाटचाल करताना ते नकोसे वाटते. लगेच त्यातील उत्साह, आत्मविश्वास कमी होतो. ज्या गोष्टींकडे पाहून स्वप्न पाहिले होते, त्या पूर्वीइतक्या हव्याहव्याशा वाटत नाहीत. असे का होते?

उत्तर एकच आहे, सर्व बाजूने वैचारिक स्पष्टता न घेता जेव्हा आपण स्वप्नांना ध्येय मानतो, त्याला ध्येय मानण्याआधी आपण काही प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत.

  • मला एका विशिष्ट कालांतराने सतत हातचे काम सोडून काहीतरी वेगळे करावे, असे वाटते का?
  • मला हाती घेतलेल्या कामात लगेच कंटाळा किंवा निराशा येते का?
  • मला आधी काही गोष्टींची नितांत गरज वाटते; पण नंतर त्याची एवढी ओढ राहते का?
  • मला नक्की आयुष्यात खरेच ध्येय ठरवायचे आहे का?
  • इतर लोकांची स्वप्ने आहेत, ध्येय आहेत म्हणून माझेही असावे, असे वाटते का?

हे काही मूलभूत प्रश्न आपण स्वप्न व ध्येयपूर्तीकडे वाटचाल करण्याआधी स्वतःला विचारावेत. पुढील लेखांमध्ये आपण स्वप्न व ध्येय, याचे एकत्रित गणित कसे बसवायचे व त्यासाठी कोणत्या दिशेने विचार करायचा, ते पाहू. लक्षात ठेवा, स्वप्न प्रेरणा देते; पण स्वप्नांचे ध्येयात रूपांतर करण्याआधी वैचारिक स्पष्टता घ्याल, तर नक्की यशस्वी व्हाल!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, बसल्या बसल्या सही घेतली का? राज ठाकरेंचा आरोप; निवडणूक अधिकार्‍यांचे स्पष्टीकरण

मोठी बातमी! 21 नोव्हेंबरला DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? सिद्धरामय्यांचं काय होणार? काँग्रेस सरकारवर मोठं संकट

Sikandar Shaikh Crime : पैलवान सिकंदर शेखच्या अटकेनंतर घरच्यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

Kabutarkhana: चार नवीन कबुतरखान्यांसाठी परवानगी, पण बाकीचे बंदच...; पालिकेचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे चर्चगेट रेल्वे स्टेशनवर दाखल

SCROLL FOR NEXT