why onion prices are rising only in winter
why onion prices are rising only in winter 
सप्तरंग

थंडीत कांद्याची मागणी का वाढते बरं?

सकाळ डिजिटल टीम

कांद्याचा दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेला आहे. कांद्याचा दर 170 रुपयांवर पोहचला असून, दररोजच्या जेवणामधून गायब होताना दिसत आहे. थंडी पडायला लागल्यापासून कांदा चर्चेत यायला लागला आहे. सोशल मीडियावरूनही काद्यांवरील जोक्स व्हायरल होताना दिसत आहेत.

कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे शहरातील अनेक हॉटेल, खाणावळी आणि वडापावच्या गाड्यांवरून कांदा गायब झाला आहे. नॉनव्हेज हॉटेलात (शाकाहारी) ग्राहकांनी कांद्यासाठी वेगळे पैसे मोजण्याची तयारी ठेवली, तरी हॉटेलचालक कांदा देण्यास नकार देत आहे. त्यामुळे कांद्याची जागा आता कोबी, मुळा आणि काकडीने घेतली आहे. भाजी-पोळी केंद्र, खाणावळी आणि हॉटेलमध्ये दरवाढीमुळे कांद्याचा वापर खूप कमी केला जात आहे. खाणावळीत 50 ते 80 रुपयांत राइस प्लेट दिली जाते. शाकाहारी थाळीसोबत ग्राहकांना कांद्याच्या एक-दोन फोडी दिल्या जात. मात्र सध्या या थाळीसोबतच कांदाच दिला जात नाही. इतर भाज्यांमध्येही कांद्याचा वापर खूप कमी केला जात आहे. जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी ग्राहकांना सध्या कांद्याऐवजी कोबी, मुळा, काकडी, गाजर किंवा कोशिंबीर दिली जात आहे.

भारतासह परदेशातही कांद्याचे दर वाढलेले दिसत आहेत. कांद्याचे दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. पण, हे दर नेहमीपेक्षा जास्त आहेत. पण, थंडीत कांद्याची मागणी का वाढत आहे बंर? याबद्दल जाणून घेऊयात.

कांद्याचे प्रकार : लाल आणि पांढरा. यात नियमितच्या भोजनात लाल कांद्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. पांढरा कांदा हा बहुतांश प्रक्रियासाठी वापरला जातो. याशिवाय कांदा पातीचे थेट सेवन केले जाते.

हवामान आणि आहारबदल...
१) पावसाळ्यात विशेषत: चार्तुमासात कांदा खाणे वर्ज केले जाते.
२) कच्चा कांदा तर वर्ज्य करतातच, परंतू अनेक कुटुंबात या काळात भाजी बनवितानाही कांद्याचा वापर होत नाही.
३) चार्तुमास संपल्यांनतर मांसाहराचे प्रमाण खूप वाढते, मांसाहरात कांद्याला सर्वाधिक महत्व आहे.
४) दररोजच्या जेवणात मसालेदार पदार्थांचे प्रमाणही खूप वाढते, यातही मसाल्यात कांद्याचा वापर तर होतोच मात्र, हे पदार्थ खाताना कच्चा कांदा खाण्याकडे लोकांचा कल वाढतो
५) पावसाळ्यांतर सर्वांनाच प्रतिक्षा असते, ती थंडीची... थंडीत पचनक्रिया अधिक क्रियाशील होत असल्याने भूक लागण्याचे प्रमाण वाढते. थंड वातापरणात पोषक आणि उष्ण, उत्तेज्जक अन्न सेवन केले जाते. तिखटसर चव आणि उत्तजेक प्रवृत्तीमुळे कांद्याचे महत्व थंडीतील अन्न सेवनात सर्वाधिक आहे.

कांद्याचे औषधी गुणधर्म : तिखट अग्निदीपक, रुचकर कफोत्सारक, उत्तेजक, मूत्रल, कामोद्दीपक गुणधर्म कांद्यात आहेत.
कांद्यातील घटक : कॅल्शिअम, अ‍ॅल्युमिन, लिग्नीन तसेच अ, ब, क जीवनसत्त्व, गंधक, फॉस्फोरिक आम्ल, तंतुमय पदार्थ, स्निग्धता

यंदा पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले असून, कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळेही ऐन थंडीत कांदा महाग होण्याचे कारण असू शकते. कांदा महाग होण्यामागची नेहमी वेगवेगळी कारणे असतात. पण, ही सुद्धा कारणे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT