Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj Sakal
सप्तरंग

युगप्रवर्तक शिवराय...

अरुण तिवारी (tiwariarun@gmail.com)

६ जून १६७४. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे. रायगडाच्या साक्षीनं मराठा साम्राज्याला आपला राजा मिळाला. मॉंसाहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेत रयतेचे राजे शिवबा स्वराज्याचे छत्रपती बनले. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं वर्णन करताना ऋषी भारद्वाज यांनी ‘जननी जन्मभूमिश्‍च स्वर्गादपि गरियसी’ (वाल्मीकी रामायण, युद्धकांड, सर्ग १२४, श्‍लोक १७) असे गौरवोद्गार काढले होते. तेव्हापासून राष्ट्र हे मातृस्वरूप बनले, भारत ही देखील सर्वांसाठी माता झाली. भारद्वाज यांचे हे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांनाही तंतोतंत लागू होते. राज्यभिषेकानंतर शिवराय शककर्ते झाले. ही एका नव्या पर्वाची सुरुवात होती.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्याची प्रेरणा पुढे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रज्वलित झाली, त्यामुळे शिवाजी महाराज अनेक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान बनले. राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या प्रेरणेच्या बळावर बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्याला धक्का दिला. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं देशाचे नायक होते. या देशातील मातीच्या कणाकणांमध्ये शिवप्रेरणा आहे.

शिवाजी महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली उभं केलेलं आरमार सर्वाधिक अभेद्य होतं पण दुर्दैवानं इतिहासानं त्याची फारशी दखल घेतली नाही. महाराजांच्या आरमाराची धडकी पोर्तुगीज आणि ब्रिटिशांना देखील घेतली होती. याच यंत्रणेनं फिरंगी जहाजांपासून आपलं अनेक वर्ष संरक्षण केलं. महाराजांनी समुद्रामध्ये किल्ले उभारून किनारपट्टी सुरक्षित केली.

मराठ्यांच्या घोडदळाचा देशभर दबदबा होता. याच बळावर त्यांनी बंगालमधील मुर्शिदाबाद आणि त्यानंतर कटक, चांदा आणि संबळपूरपर्यंत धडक मारली. मराठा सैन्य १७४० मध्ये दक्षिणकडे अरकोटपर्यंत पोचलं होतं. येथे परकीयांना ताब्यात घेतलेला मोठा भूभाग मराठा सैन्याने स्थानिकांना मिळवून दिला. मराठा सैन्याने त्यावेळी गाजविलेले शौर्य खरोखरच अतुलनीय होतं. उत्तरेमध्ये १७५८ साली मराठ्यांनी दिल्लीपर्यंत झेप घेत अफगाणी आक्रमकांना धूळ चारली. पेशवा बाजीराव (पहिले) यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा पराक्रम गाजविला. यावेळी मध्यभारत आणि राजपुतानामध्ये मराठ्यांचे अश्‍व तुफान वेगाने दौडत होते. पठाण आक्रमकांना जबर मार देत मराठ्यांनी अटक आणि नंतर पेशावरपर्यंत धडक मारली. मराठे पानिपतचे तिसरे युद्ध जिंकले असते तर ब्रिटिशांना भारतात पायही ठेवता आला नसता.

पुढे जवळपास शंभर वर्षांनी ब्रिटिशांशी दोन हात करताना लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ची हाक दिली. ‘‘ स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ’’ हे त्यांचे उद्गार जगभर गाजले. स्वातंत्र्यानंतर देखील आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये हीच शिवप्रेरणा महत्त्वपूर्ण ठरली. शिवाजी महाराजांशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामातील सर्व आदर्श गुणांचा समुच्चय आपल्याला शिवाजी महाराजांमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येक देशवासीयांच्या मनातील शिवाजी महाराजांचे स्थान अढळ आहे. काही इतिहासकारांनी ‘मराठा’ हा शब्द जात आणि प्रांतापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला पण शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने अठरापगड जातीचे राज्य होते. ते रयतेचे राज्य होते. या स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रत्येकजण प्राणपणाने लढला. कारण प्रत्येकाला हे ठावूक होतं की आपण शिवराष्ट्र अन्‌ स्वराज्यासाठी लढत आहोत.

(सदराचे लेखक वैज्ञानिक, तसेच विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

SCROLL FOR NEXT