Rahul Gandhi-Narendra Modi
Rahul Gandhi-Narendra Modi 
सप्तरंग

राहुल की पप्पू..?

संदीप काळे saptrang@esakal.com

राहुल गांधी, (rahul gandhi) नरेंद्र मोदींच्या भाषेत राजकुमार, राजपुत्र आणि त्यांच्या अंध भक्तांच्या नजरेत पप्पू... असे काही काही हिणवून सत्ताधारी पक्षाने राहुल गांधी हे व्यक्तिमत्त्व लोकांच्या नजरेत पाडले. राहुल गांधींचे नेतृत्व नाकारले. पण, कोरोनाच्या काळात मला राहुल गांधींनी जी आक्रमक भूमिका घेतली, तितकी आक्रमक भूमिका मला कुणाचीही दिसली नाही. सत्ताधारी पक्षांचे, जेंव्हा जेंव्हा चुकत होते तेंव्हा तेंव्हा राहुल गांधींनी आपली भूमिका अगदी आक्रमकपणे मांडली. सत्ताधारी पक्ष राहुल गांधींना चिडवू शकतो, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. (Congress former president rahul gandhi)

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या घरी जन्म घेतलेल्या राहुल गांधींना जन्मजात राजकारणाचे बाळकडू मिळाले असले तरी त्यांनी राजकारणाचे धडे घेतले नव्हते. घेतले नव्हते यासाठी म्हणतोय, कारण राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची स्वतःची सुद्धा कधी इच्छा राजकारणात उतरण्याची नव्हती. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारखे मातब्बर राजकारणी व्यक्तिमत्वे यांचा घरात राब्ता असताना देखील राजीव गांधी हे राजकारणपासून कोसो दूर होते. आपल्या आनंदी जीवनात व्यस्त होते. परंतु काळाचा महिमा, इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि अचानकपणे राजीव गांधींना राजकारणात यावे लागले. इंदिरा गांधीजींच्या हत्येमुळे संपूर्ण भारतात शिख विरोधी एक वातावरण निर्माण झाले होते. दिल्ली, तर दंगलीनी उसळून गेली होती. अशा वातावरणात राजीव गांधींनी काँग्रेसला सांभाळले.

काँग्रेसने अनेक जागा जिंकून, राजीव गांधी यांना पंतप्रधान पदी बसविण्यात आले. त्याही वेळेस काँग्रेसने इंदिरा गांधीच्या नावे इमोशनल कार्ड खेळले असा आरोप केल्या जातो. इथपर्यंत हे ठीकही असेल, परंतु इंदिरा गांधी यांच्यावर जो लोकांचा विश्वास होता तोच त्यांनी राजीव गांधी यांच्यावर दाखवला. राजीव गांधी यांना इच्छा नसताना राजकारणात यावे लागले. सगळे काही, सुरळीत चालू असताना 1991 साली राजीव गांधी यांची सुद्धा हत्या झाली. एकाच परिवाराच्या बाबतीत किती लोकांनी षडयंत्र खेळले. अनेकदा ह्या प्रश्नाचा विचार करून खूप मनात प्रश्न निर्माण होतात. लोकांनी त्यांच्या शरीराला संपविण्याचे धाडस केले, लोकांच्या वाईट विचारांवर कीव यायला लागते. शरीर संपविले तरी, विचार अजूनही शिल्लक आहेत ना. विचार मारता आले असते तर या वाईट लोकांनी महिती नाही, कुणाचा नंबर पहिला लावला असता. तसा महात्मा गांधीजींचा लावलाच की...

राजीव गांधी, यांची हत्या झाल्यानंतर अनेकांनी सोनिया गांधी यांना काँग्रेस मध्ये येण्यासाठी आग्रह धरला. परंतु त्या लवकर तयार झाल्या नाहीत. शेवटी, 1997 मध्ये त्यांनी राजकारणात यायचे ठरविले. खरेतर, सोनिया गांधी यांना मानावेच लागेल. आपला जन्म या देशातील नसून, आपला नवराही आता या जगात नाही आहे असे म्हणून त्यांनी आपल्या देशातून काढता पाय घेतला असता. परंतु, सोनिया गांधी यांनी तसे काहीही न करता, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाला पुढे नेण्याचे काम केले. राजकारणात सोनिया गांधी यांनी प्रवेश केल्यानंतर, अनेकांनी निंदा-नालस्ती, गलिच्छ भाषेत त्यांच्यावर टीका केली. 'एंटोनिया दी मायनो' मूळ नावावरुन चिडवले जाणे. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी "ह्या बाईला किराणा मालाची यादी दिली तरी वाचून दाखवेल" अशी टीका केली होती. परंतु, वारे सगळ्यांचेच फिरतात. आज, उद्धव ठाकरे काँग्रेसमुळेच मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत. मुळात, काँग्रेसचा स्वभावच तो नाही आहे, मनात काहीतरी ठेवुन बसणे. तसे असते तर, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याला माफ करा असे कधी म्हटलेच नसते.

सोनिया गांधी, पंतप्रधान होऊ शकल्या असत्या परंतु विदेशी असल्याचा त्यांना त्रास सहन करावा लागला. "सोनिया गांधी, पंतप्रधान झाल्या तर मी स्वतःचे मुंडण करून घेईल " अशा भाषेत सुषमा स्वराज यांनी उघड धमकी दिली होती. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर, कितीतरी वेळा गांधी कुटुंबीयांना संपविण्याचे धमकीचे पत्र त्यांना येत. परंतु, गांधी कुटुंबिय न डगमगता आपल्या देशात राहून त्यांनी काँग्रेसला मोठे केले.

अशा, कुटुंबीयांतील सदस्य म्हणजे राहुल गांधी. सत्ताधारी पक्षाच्या वतीने राहुल गांधीची जी प्रतिमा तयार केली, त्यात अर्धे निम्मे त्यांचेच लोक बसतात. पप्पू असे हिणवून आपल्याच पक्षाची काय प्रतिमा तयार होते, यावर सत्ताधारी लोकांनी लक्ष द्यायला हवे. मुळात त्यांच्या इतके हुशार व्यक्तिमत्त्व क्वचितच भाजप मध्ये असेल. आपले काका, आजी, वडील सगळे काही संपले असताना त्यांनी कधी स्वतःच्या देशाचे महत्व कमी केले नाही उलट देशाला सर्वोच्च स्थानी मानले. राहुल गांधी, यांना रामदेव बाबा यांनी सुद्धा चिडवायचे सोडले नाही, पण आज काय झाले रामदेव बाबांनी स्वतःचेच हसू करून घेतले.

आजही राहुल गांधी भविष्यात पंतप्रधान झाले पाहिजे, असे अनेक लोकांना वाटते. आजही खेड्या पाड्यात वृद्ध असणार्‍या अनेकांशी बोलल्यानंतर इंदिरा गांधी बद्दल आपुलकी दिसायला लागते, आणि राहुल गांधी मध्ये ते जुन्या काँग्रेसला शोधायला लागतात. राहुल गांधी यांना अनेक तरुण आयडॉल मानतात. मनापासून वाटते कुणीतरी आता तरुण पंतप्रधान व्हायला हवेत. राहुल गांधी यांनी जितक्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, त्याच्या निम्मे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या नाहीत. नरेंद्र मोदी यांचा एक वेगळा फॅन क्लब आहे आणि राहुल गांधी यांचा. राहुल गांधी, यांना कितीही कमजोर समजले तरी त्यांना दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. नरेंद्र मोदी यांचे सध्या बोलणार्‍यांचे आंबट बोर विकले जातात त्यासारखे झाले आहे. परंतु, हे जास्त काळ टिकणार नाही असे दिसत आहे. राहुल गांधी एक हुशार व्यक्तिमत्त्व आहे, हे त्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या ट्विट मधून दाखवून दिले आहे. राहुल गांधी, हे भविष्यात पंतप्रधान होतील नाही होतील माहिती नाही, परंतु त्यांनी केलेल्या त्यागाला सत्ताधारी पक्षाने नावे ठेऊ नयेत. राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे, असा संकल्प काँग्रेसने आजच्या दिवशी केला. हा संकल्प खरा होईल की नाही हे येणारा काळ ठरवेल. परंतु, जिथे एका चहावाल्या व्यक्तीला संधी दिली जाऊ शकते तिथे एका तरुण आणि तडफदार नेतृत्वाला संधी देण्यास काय हरकत आहे. नाही का?

राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT