esakal | शिवसेनेला शिंग कुठे आहेत? - नारायण राणे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Narayan Rane

शिवसेनेला शिंग कुठे आहेत? - नारायण राणे

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी शिवसेनेवर आज सडकून टीका केली. आपल्या खास शैलीत त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. "३९ वर्ष शिवसेना (shivsena) वाढवण्यासाठी कष्ट केले. जिवाची पर्वा न करता मेहनत केली. माझे अनेक सहकारी आज सोबत नाहीयत. मी वाचलो, ते आई-वडिलांची पुण्याई आहे. ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं ते शिवसैनिक कुठे आहेत? आज लाभ कोण उठवतय ? ज्यांनी शिवसेना वाढवायला कष्ट घेतले ते कुठेच नाहीत" असे राणे म्हणाले. (Bjp leader & mp narayan rane Warn & slam shivsena)

आज शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी पेट्रोल सवलतीत आणि भाजपवाल्यांना मोफत देण्याच्या विषयावरून येथे शिवसेना-भाजपमध्ये (shiv sena and bjp) वाद झाला. त्यावर नारायण राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, "राडा नाही झाला वैभव नाईक पळाला. शिवथाळीतली भाजी त्याला मिळाली. कधीतरी शिवथाळी सुद्धा मिळेल" असा अप्रत्यक्ष इशारा दिला.

हेही वाचा: कांदिवलीपाठोपाठ बोरिवलीतही बोगस लसीकरण? आदित्य कॉलेजमधील घटना

"शिवथाळी ही शिवसेनेची नाही, सरकारची आहे. पोटभर जेवण देण्याची आताच्या शिवसेनेत ताकत नाही. शिवसेना भवन जसं शिवसैनिकांसाठी मंदिर आहे, तसं राम मंदिर आमची अस्मिता आहे" असे राणे म्हणाले. संजय राऊतांना दिलेल्या इशाऱ्यावर ते म्हणाले की, "शिवसेनेला शिंग कुठे आहेत? बिनशिंगांची शिवसेना आहे. फटकेदेणारी शिवेसना राहिली नाही. ती संपली, पैसे जमवणारी शिवसेना आहे" अशी टीका राणेंनी केली.

हेही वाचा: मुंबईत लसीला प्रचंड डिमांड, २० लाख डोसची मागणी

सेना भवनसमोरील राड्यावर राणे स्टाइलने भाजपाकडून उत्तर मिळेल, असे त्यांनी सांगितले. "भाजपाकडून त्यांना थाळी दिली जाईल त्यात राणे असतील. राणे उतरतात, तेव्हा पळणाऱ्यांना संधी देत नाहीत. जे, पळाले त्याचे हात-पाय नाही विसरणार" असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

loading image