Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 01 सप्टेंबर

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - भाद्रपद शु. 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, अनंत चतुर्दशी, चंद्रोदय सायं.6.31, चंद्रास्त प.5.25, भारतीय सौर 10, शके 1942.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१२ - भारतीय चित्रपटसृष्टीतील १९३० ते १९६० च्या कालपटलावर आपली मुद्रा उमटविणाऱ्या विख्यात अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म.
१९१५ - उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म. देवदास, मधुमती, अनुराधा, सत्यकाम, मेरे सनम या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या आहेत. 
१९५० - बंगाली कादंबरीकार विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. पथेर पांचाली, अपराजित, आरण्यक या कादंबऱ्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती. ‘इछामती’ या कादंबरीला रवींद्र पुरस्कार देण्यात आला. 
१९९५ - नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा आंबेडकर फेलोशिप (तत्त्वज्ञान) राष्ट्रीय पुरस्कार बेलसर येथील शिक्षक दिगंबर चिमाजी कदम यांना जाहीर.
१९९८ - जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या आकाश या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी यशस्वी चाचणी घेतली. 
१९९९ - रॉकेट तंत्रज्ञानाचे प्रणेते व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांचे निधन.

दिनमान -
मेष :
बौद्धिक क्षेत्रात प्रगती. संततीच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल. 
वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता. उत्साह वाढेल.
मिथुन : कीर्ती, मानसन्मान लाभेल. तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होतील. 
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहणार आहे. 
सिंह : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह वाढेल.
कन्या : मनस्ताप होण्यासारख्या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील.
तुळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
वृश्‍चिक : गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 
धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रसिद्धी लाभेल.
मकर : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमची मते इतरांना पटवून द्याल. 
कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात सुयश लाभेल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शक्यतो प्रवास टाळावेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT