Astrology and Horoscope
Astrology and Horoscope Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 मे 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : चैत्र कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ६.३८, चंद्रास्त सायंकाळी ६.४३, सूर्योदय : ६.०३, सूर्यास्त : ६.५८, दर्श अमावास्या, सत्तु अमावास्या, समाप्ती रा. १२.३०, सूर्याचा कृत्तिका नक्षत्रप्रवेश, वाहन – बेडूक, भारतीय सौर वैशाख २१ शके १९४३.

दिनविशेष -

१८८८ - मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली.

१८९५ - प्रख्यात भारतीय विचारवंत व तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म.

१९१४ - प्रसिद्ध गायिका व संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र विशेष गौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार इ.पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे.

१९५१ - भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार होऊन डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली.

१९९३ - ‘माणूस’मधील हवालदाराच्या भूमिकेने अजरामर झालेले तसेच राजस व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते शाहू मोडक यांचे निधन.

दिनमान -

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : काहींचे वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल. मनोबल उत्तम राहील.

कर्क : मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

तुळ : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

धनु : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नोकरीत प्रगती होईल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT