Astrology and Horoscope
Astrology and Horoscope Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 मे 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : वैशाख शुद्ध २, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.५८, चंद्रास्त रात्री ८.२५, सूर्योदय : ६.०२, सूर्यास्त : ६.५९, चंद्रदर्शन, पारशी दये मासारंभ, भारतीय सौर वैशाख २३ शके १९४३.

दिनविशेष -

१९९२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भाऊराव ऊर्फ मुरलीधर दत्तात्रेय देवरस यांचे निधन.

१९९६ : प्रसिद्ध लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सोच समझ के’ या भारतीय कुटुंबनियोजन संस्थेच्या निर्मितीला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

१९९९ : विदर्भ विकासासाठी खऱ्या अर्थाने परिश्रम घेऊन वैज्ञानिक विकास मंडळाची स्थापना पदरात पाडून घेणारे कामगार नेते, माजी खासदार ॲड. श्री. वा. धाबे यांचे निधन.

२००१ : ‘गाईड’, ‘मालगुडी डेज’यांसारख्या कादंबऱ्यांचे लेखक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कादंबरीकार पद्मभूषण राशिपुरम कृष्णस्वामी ऊर्फ आर. के. नारायण यांचे निधन.

दिनमान -

मेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कामाचा ताण जाणवेल.

कर्क : काहींची वैचारिक प्रगती होईल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : गुरूकृपा लाभेल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनु : प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मकर : वैचारिक प्रगती होईल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

कुंभ : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT