Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १७ फेब्रुवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार : माघ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी १०.३३, चंद्रास्त रात्री ११.२१, सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.३४, भारतीय सौर माघ २७ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५६ : अमेरिकन संशोधक फ्रेड्रिक युजिन आयव्हेक्‍स यांचा जन्म. छायाचित्रांच्या छपाईसाठी ठिपक्‍यांचा वापर करण्याचे हाफटोन तंत्र शोधून काढण्यात त्यांनी यश मिळविले. तोपर्यंत छपाई चित्रांचाच वापर होत असे. छायाचित्रे वापरता येत नसत.
१८८३ : क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे एडन येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना निधन.
१९३२ : जेम्स चॅडविक या ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिकाने कॅव्हॅंडिश प्रयोगशाळेत अणूतील सूक्ष्म न्यूट्रॉन कणांचा शोध लावला.
१९७८ : प्रसिद्ध मराठी कवी, कादंबरीकार, समीक्षक, नाटककार व संपादक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन.
२००० : भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक वाहनासाठी (जीएसएलव्ही) आवश्‍यक असलेल्या ‘क्रायोजेनिक संचातील’ चाचणी करण्यात भारत यशस्वी. 
२००१ : मराठी चित्रपटरसिकांच्या हृदयसिंहासनावर अर्धशतकाहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारे श्रेष्ठ अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांडरे यांचे निधन. 

दिनमान -
मेष :
रखडलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल.
वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. 
कर्क : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.
कन्या : काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
तुळ : आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवासात काळजी घ्यावी.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल.
मकर : व्यवसायातील निर्णय मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल.
कुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

#MyModiStory कशी झाली होती फडणवीस आणि मोदींची पहिली भेट? कार्यक्रम आयोजक ते मुख्यमंत्री...

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः करा फाईल

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

Ashok Saraf : "वक्ख्या विक्खी वुख्खू" फेम अशोक मामांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार जाहीर, लवकरच कोल्हापुरात सोहळा

SCROLL FOR NEXT