Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १९ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : फाल्गुन शुद्ध ६, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सकाळी १०.२१, चंद्रास्त रात्री ११.४४, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ६.४४, भारतीय सौर फाल्गुन २८ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९७ : मराठी चित्रपटातील नामवंत संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म. त्यांनी ‘लपंडाव‘, ‘अर्धांगी’, ‘मोरुची मावशी’, ‘ब्रह्मघोटाळा’ वगैरे चाळीस चित्रपटांना संगीत दिले होते.
१९९९ : संपूर्ण देशी बनावटीच्या पिनाक या एका वेळी अनेक रॉकेट फेकण्याची क्षमता असलेल्या यंत्रणेची यशस्वी चाचणी ओरिसा राज्यातील चंडीपूरजवळ करण्यात आली.
२००१ : वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जॅक्‍स कॅलिसला पायचीत करुन पाचशेवा बळी मिळविला.
२००२ : भरवशाचा यष्टिरक्षक असा लौकिक असणारे भारताचे माजी यष्टिरक्षक नरेन ताम्हाणे यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह, उमेद वाढेल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : आत्मविश्‍वास वाढेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. संततिसौख्य लाभेल.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात प्रगती होईल.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT