Horoscope and Astrology
Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 जून 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय सायंकाळी ७, चंद्रास्त सकाळी ६.३५, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, ज्येष्ठ पौर्णिमा, वटपौर्णिमा, वृषभ पूजन (कारहुणवी), मन्वादी, कुलधर्म, अन्वाधान, पौर्णिमा समाप्ती रात्री १२.१०, भारतीय सौर आषाढ ३ शके १९४३.

दिनविशेष -

१८९७ : प्रसिद्ध गायक, संगीत क्षेत्रातील एक अभ्यासक, कलावंत, पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म. त्यांना १९५५ मध्ये ‘पद्मश्री’ सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.

१८९९ : क्रांतिवादी बंगाली मुस्लिम कवी आणि हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रभावी समर्थक कवी काझी नझरुल इस्लाम यांचा जन्म. त्यांनी दोन हजारांहून अधिक भावगीते नवनवीन छंदांत रचली. भारताच्या फाळणीचे ते विरोधक होते.

१९८० : माजी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांचे निधन. त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

१९९६ : अलिगड मुस्लिम विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मोहंमद शरीफ यांना अलाहाबाद विद्यापीठातर्फे संस्कृतमधील डी.लिट पदवी प्रदान.

१९९६ : ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन’मध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे नामवंत पत्रकार अप्पन मेनन यांचे निधन.

१९९७ : आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचे निधन.

१९९८ : ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण पुरस्कार’ जाहीर.

दिनमान -

मेष : गुरूकृपा लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : संततिसौख्य लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

तुळ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.

वृश्‍चिक : अचानक लाभाची शक्यता आहे. व्यवसायात नवीन तंत्र आणाल.

धनु : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.कामात सुयश लाभेल.

मकर : वाहने सावकाश चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ : आर्थिक सुयश लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

मीन : प्रतिष्ठा व मानसन्मान लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT