Horoscope and Astrology
Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 जुलै 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : आषाढ कृष्ण ३, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय रात्री ९.१७, चंद्रास्त सकाळी ८.०९, भद्रा, भारतीय सौर श्रावण ४ शके १९४३.

दिनविशेष -

१८४४ : कायदेपंडित व शिक्षणतज्ज्ञ गुरुदास बॅनर्जी यांचा जन्म. १८७८ मध्ये टागोर व्याख्यानमालेतील ‘हिंदू लॉ ऑफ मॅरेज अॅण्ड स्त्रीधन’ या विषयावर त्यांनी दिलेली व्याख्याने मौलिक ग्रंथ मानतात.

१८५६ : विख्यात लेखक, नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म.

१८७४ : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म. त्यांनी केलेल्या समाजसुधारणांमुळे त्यांना ‘राजर्षी’ म्हणून ओळखण्यात येत असे.

१८९१ : बंगाली प्राच्यविद्या संशोधक राजेंद्रलाल मित्र यांचे निधन. १८८५ मध्ये ते एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष झाले. भारतीय शिल्पकला, वास्तुकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील निबंध, संस्कृत ग्रंथांचे विवेचन, संस्कृत हस्तलिखितांचे सूचिग्रंथ ही त्यांची ग्रंथसंपदा.

दिनमान -

मेष : आर्थिक सुयश लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : वाहने सावकाश चालवावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तूळ : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

वृश्‍चिक : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनू : हितशत्रूंवर मात कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर : काहींना अचानक धनलाभ. व्यवसायातील प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT