Horoscope and Astrology
Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 जुलै 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : आषाढ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय रात्री १२.१६, चंद्रास्त दुपारी १२.२८, सूर्योदय ६.१३, सूर्यास्त ७.०८, कालाष्टमी, भारतीय सौर श्रावण ९ शके १९४३.

दिनविशेष -

१८६५ - मुंबईतील प्रसिद्ध कार्यकर्ते आणि दानशूर नागरिक जगन्नाथ शंकरशेट यांचे निधन. त्यांच्या स्मरणार्थ संस्कृत विषयासाठी देण्यात येणारी जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते.

१८७२ - प्राचीन मराठी वाङ्‌मय आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचा जन्म. त्यांनी ‘मोरोपंत ः चरित्र आणि काव्यविवेचन’, ‘ एकनाथी भागवत’, ‘श्री ज्ञानेश्वर महाराज ः चरित्र व ग्रंथविवेचन’, ‘ श्री तुकाराम चरित्र’ असे ग्रंथ लिहिले.

१८८० - हिंदी-उर्दू कादंबरीकार व कथालेखक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव धनपतराय. त्यांनी सुमारे पंधरा कादंबऱ्या व तीनशे कथा लिहिल्या. त्यांच्या गाजलेल्या कथा-कादंबऱ्यांचे अनुवाद अनेक भारतीय व काही युरोपीय भाषांमध्ये झाले आहे.

१८८७ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रसायनशास्त्रज्ञ प्रा. द. बा. लिमये यांचा जन्म. पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूट या संस्थेचे ते संचालक होते. ‘करंजीन’ हे द्रव्य व ‘निधोन प्रक्रिया’ या शोधांबद्दल ते प्रसिद्ध होते. पुणे विद्यापीठाने ‘डी.लिट.’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता.

दिनमान -

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

वृषभ : वाहने जपून चालवावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक.

कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. एखादी जबाबदारी येईल.

तूळ : नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनू : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. संततिसौख्य लाभेल.

मकर : कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : जिद्द वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन : कौटुंबिक जीवनात विसंवाद संभवतो. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT