Overcome fear sakal
सप्तरंग

मानससूत्र : भयावर मात

जी गोष्ट आस्तित्वातच नाही, त्यावर मात करण्याची गरजच काय? होय! भीती हा आपल्या मनाचा कल्पनाविष्कार.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. जयश्री फडणवीस

जी गोष्ट आस्तित्वातच नाही, त्यावर मात करण्याची गरजच काय? होय! भीती हा आपल्या मनाचा कल्पनाविष्कार. ऐकीव कथांवर; तसेच पूर्वी कधीतरी, अगदी एखाद्याच वेळी आलेल्या अनुभवाचा अतिरेक आपण कल्पनाविश्वात करत असतो. भीतीला जन्म देतो. ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते त्याची जर यादी केली, तर ५० पैकी ४७-४८ गोष्टी घडल्या नाहीत हे आपल्या लक्षात येईल. म्हणूनच छान छान गोष्टींचाच विचार करण्याची सवय मनाला लावा. सुंदर कल्पनाविष्कार करायला शिका.

हे सांगणे जितके सोपे आहे, तितके करणे सहज साध्य होत नाही. भीतीवर मात करण्याकरता जाणीवपूर्वक सक्रिय, धोरण आखावे लागेल. आयुष्यातील अनुभवांकडे बघण्याचा दृष्टिकोन विधायक करावा लागेल. शास्त्र व बुद्धिप्रामाण्यवादाचा वापर सातत्याने करावा लागेल. त्याकरता खालील काही पद्धतीचा, सूचनांचा प्रयोग करून बघा.

1) स्वतःला नेमकी कशाची भीती वाटते त्याचा शोध घ्या आणि स्वतःशी कबूल करा, की या भीतीमुळे माझी अनेकदा पीछेहाट होते. ही भीतीच अपयशाचे कारण ठरते. ही जाणीव जेव्हा स्वीकाराल, तेव्हा भीतीवर मात करण्याची पहिली पायरी तुम्ही ओलांडलेली असेल.

2) भीतीचे मूळ कारण शोधून काढा. एकदा कशाची नेमकी भीती वाटते हे कळले, की आपल्या अंर्तमनात - दडलेली त्याची कारणे शोधून काढणे सोपे जाईल. गत अनुभव, विश्वास! अंधविश्वास; तसेच मानसिक आघात अशा सर्व गोष्टी पडताळून पाहा. यापैकी नेमकी कोणती गोष्ट माझ्यातील भयाला खतपाणी घालते आहे, ते नेमके कारण कळल्यामुळे भयमुक्त घेण्याची धोरणे स्वतःलाच आखता येतील.

3) स्वतःला प्रशिक्षित करा : भय हे अनेकदा अनोळखी; तसेच अपरिचित गोष्टींमधूनही निर्माण होत असते. अशा गोष्टींचा नीट परिचय करून घ्या. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की शास्त्र, तत्त्व आणि बुद्धिप्रामाण्यवाद याचे मीटर आपल्याला सतत वापरायचे आहे. आपली मानसिक; तसेच भावनिक बुद्धिमत्ता कायम या तत्त्वांवर तपासण्याची सवयच आपल्याला लागली पाहिजे.

4) मानसिक असुरक्षितता; तसेच संवेदनशीलता कमी करणे : असे आपण कायम म्हणतोच, की भीतीपासून पळून जाऊ नका, तर भीतीला सामोरे जा; पण हे करत असताना सारासार विचार करून, स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत सामोरे जा, संवेदनशीलतेचाही समतोल साधावा लागेल. असे केल्याने आत्मविश्वास वाढून भीतीला तोंड देणे सोपे होईल.

5) भयाला सामोरे जाण्याची यंत्रणा (Coping Mechanism) : भयमुक्त होण्याकरता मनातील न्यूनगंड काढून टाका. या न्यूनगंडांचा निश्चितच मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञाची मदत नक्कीच घेतली पाहिजे. कोणाचीही मदत घेणे हे हतबलतेचे लक्षण नव्हे हे लक्षात ठेवा.

6) संवाद : कोणत्याही प्रकारची भीती वाटत असल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींशी म्हणजेच कुटुंबाशी, मित्र- मैत्रिणींशी संवाद साधा. त्यांच्या अनुभवांचा विचार करा. योग्य व्यक्तींशी संवाद करणे अतिशय आवश्यक आहे. आजकाल संवादाची अनेक साधने उपलब्ध आहेत. समोरासमोर संवाद जमत नसल्यास त्यांचा वापर निश्चित करा.

7) स्वतःची काळजी घ्या : आहार-विहार, आचार-विचार याचा समतोल साधल्यास मानासिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. योगनिद्रा, योग अभ्यास, ध्यान, प्राणायाम; तसेच व्यवस्थित झोप हे सर्व उत्तम निरोगी व आनंदी जीवन जगण्यास गरजेचे आहे.

8) कल्पनाशक्ती (Power of visualization) ही मानवाला मिळालेली अद्‍भुत देणगी आहे. त्याचा वापर आपण आयुष्यातील अपेक्षित इच्छा तसेच ध्येयप्राप्तीसाठी उतम पद्धतीने करू शकतो. भयावर मात करण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे. उदा. जर तुम्हाला स्टेजवर भाषण करण्याची भीती वाटत असेल, तर सतत डोळ्यांसमोर कल्पनाशक्तीचा वापर करत तुम्ही खूप छान भाषण करताय असे बघा. भाषण संपल्यावर लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या असेही बघा.

कोणत्याही प्रकारची भीती या माध्यमातून टाकता येइल. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद सांगून गेले, ‘तुम्ही जसा विचार करता, तसेच बनत जाता, रक्तःला कमकुवत समजाल, तर कमकुवतच राहाल, आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यवान व्हाल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT