Present
Present 
सप्तरंग

#MokaleVha प्रेझेंट

डॉ. विद्याधर बापट

वडील सावकाश पावलांनी सुजयच्या खोलीत आले, रात्रीचे १२ वाजून गेले होते. पलंगावर गाढ झोपलेला अठरा वर्षांचा सुजय एखाद्या लहान बाळासारखा वाटला. वडिलांनी सुजयच्या अंगावरचं पांघरूण सारखं केलं. हातातलं पत्र आणि नवीन मोबाईल त्याच्या उशाशी ठेवला. पत्रात लिहिलं होतं...

‘प्रिय सुजय,
अभिनंदन खूप छान गुण मिळविल्याबद्दल! आणि सर्वच बाबतीत छान प्रगती केल्याबद्दल. पाय घसरता-घसरता तू सावरलास. त्यात तू माझ्या सूचनांचा सकारात्मक दृष्टिकोन बाळगून केलेला स्वीकार होताच; पण तू स्वत: केलेले प्रयत्न जास्त महत्त्वाचे होते. तुझ्यासाठी तुला हवा आहे, तो स्मार्टफोन घेतला आहे. टेक्नॉलॉजी माणसाच्या प्रगतीसाठी आहे. तिचा चांगला वापर केला तर ते वरदान, नाहीतर शाप. आणि हो, तुझे आभारही मानायचेत मला... फोन आणि संगणकातल्या अनेक गोष्टी तू मला शिकविल्याबद्दल! माझ्या पिढीनंही आता अपडेट व्हायला हवं हे मला पटलंय. खूप मोठा हो बाळा, एक चांगला माणूस आणि नागरिक हो. 
- तुझा मित्र आणि नात्याने वडील’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळी वडील नेहमीप्रमाणे व्यायामासाठी जाऊन परतले, तेव्हा त्यांच्या खोलीत टेबलावर ठेवलेलं छान पॅकिंग केलेलं पेंटिंग होतं आणि सोबत सुजयचं पत्र -
‘प्रिय बाबा,
Happy BirthDay. तुमचं पत्र वाचलं. मला भरून आलं. फोन खूप छान आहे. thanks. मला रडू आलं, कारण सहा महिन्यांपूर्वीचा पाय घसरू शकेल, अशा अवस्थेतला मी आणि आजचा मी यात खूप फरक पडलाय तो तुमच्यामुळे. मला आठवतंय दहावीला मेरिटमध्ये आलेलो मी कॉलेजमध्ये गेल्यावर पूर्ण बदलून गेलो. नको त्या मित्रांच्या नादाने, रात्र-रात्र बाहेर राहायचो. रात्रभर सोशल साइट्सवर चॅटिंग, नको त्या गोष्टी, चित्र, फिल्म्स पहाणं, वाटेल तसे पैसे उधळणं, एखाद्या दु:स्वप्नाप्रमाणे ते दिवस होते. तुम्हाला आणि आईला खूप त्रास दिला मी. 

पहिल्या सेमिस्टरला अनपेक्षितपणे फेल झालो, अन् त्या स्वप्नातून जागा झालो. तुम्ही खूप समजावलंत. कधी ही मारलं नाही, की स्वत:चा तोल जाऊ दिला नाही. तुम्ही मला सरांकडे घेऊन गेलात. माझ्या चुका मला कळतील, पटतील असे सगळे उपाय केलेत. आज मी पुन्हा योग्य मार्गावर आहे. मी पुन्हा परीक्षेत पहिला आलोय. त्याचं सगळं श्रेय सरांना आणि तुम्हाला आहे. बाबा तुम्ही लहानपणापासून माझ्याशी जे वागलात ते मला आज सांगावसं वाटतं. 
१. माणसं चुका करतात, तशी सावरूही शकतात हा विश्वास तुम्ही मला दिलात. 
२. लहानपणापासून तुमची वागणूक शिस्तप्रिय, आदर्श आणि तरीही प्रेमळ होती. मला आणि ताईला नेहमीच तुमच्याजवळ मोकळं होता आलं. स्वत:च्या खिशाला खार लावून आमची हौसमौज पूर्ण केलीत. पण फालतू लाड केले नाहीत. 
३. लहानपणापासूनच घरातलं वातावरण प्रसन्न कसं राहील याकडे तुम्ही आणि आईनं लक्ष दिलं. ऑफिसमधले ताणतणाव तुम्ही आणि आईने कधीच घरी आणले नाहीत. 
४. लहानपणापासून तुम्ही मला ध्येयाचा पाठपुरावा कसा करावा, उत्तम शारीरिक आरोग्य, उत्तम मानसिक आरोग्य, नात्यांची जपणूक, पुरेसा पैसा (तुम्ही म्हणायचात ‘लालसा’ कुठे सुरू होते हे ओळखता आलं पाहिजे आणि थांबता आलं पाहिजे.) आनंदात जगण्याची कला आणि समाधानी वृत्ती या गोष्टी असल्या, की व्यक्ती समृद्ध आहे हे तुम्ही सांगितलंत.
५. श्रेया मला आवडते, हे तुम्हाला मी मोकळेपणानं सांगितलं. तुम्ही ते स्वीकारलंत. आम्ही दोघांनी हे नातं जपताना कोणती काळजी घ्यायला हवी, हे समजावून सांगितलंत. करिअर प्रथम आणि नातं त्यानंतर ही गोष्ट समाजावलीत. हे आम्हाला दोघांनाही पटलं. 
६. लहानपणापासून वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या, मला जमतील ती कामं सांगत गेलात, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. 
७. नेहमी माझ्यातल्या सकारात्मक गोष्टींना प्रोत्साहन दिलंत. निराश झालो तेव्हा धीर देत उभं राहायला मदत केली. त्यामुळे कधी अपयश आलं तरी मी खचलो नाही. 
८. चुकलो तेव्हा तुम्ही रागावलात, पण नंतर प्रेमानं जवळ घेऊन समजावलंत.  
बाबा, मधल्या काळात मी थोडा वहावत गेलो होतो. पण आज वाटतं ते बेभान दिवस अंतिमतः केवळ दुख:दायी ठरले असते. कारण क्षणिक मोहापायी माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. तुम्ही मला जागं केलंत. सावरायला मदत केलीत. तुमचे आभार कसे मानू कळत नाही; पण आता सगळं छान होईल. मला माझ्या बाबांचा अभिमान वाटतो. लव्ह यू बाबा. 
- तुमचा सुजय
वडिलांच्या डोळ्यांत पाणी आलं आणि ते सुखावले

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT