bhavishya
bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा

दिनमान 11 डिसेंबर 2019 

मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. ज्वेलरी, साडी सेंटर व केटरर्स या क्षेत्रातील व्यावसायिकांना विशेष यश लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल. 

वृषभ : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश लाभेल. 

मिथुन : कोणतेही निर्णय घेताना साधकबाधक विचार करावयास हवा. काहींना नातेवाईकांची जबाबदारी घ्यावी लागेल. नोकरीत वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

कर्क : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन प्रयोग करू शकाल. नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. 

सिंह : दिवस अनेक दृष्टीने यशस्वी ठरणार आहे. उत्साह, उमेद वाढेल. दिवसभर उत्साहाने कार्यरत रहाल. 

कन्या : नवीन परिचय होतील. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. 

तूळ : शुभ कामे पुढे ढकलावीत. एखादी महत्त्वाची व गुप्त बातमी समजेल. शासकीय कामात यश लाभेल. 

वृश्‍चिक : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. सफलता प्राप्त होणार आहे. 

धनू : अडचणी जाणवणार आहेत. सहकार्याची अपेक्षा करू नका. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. 

मकर : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. यश मिळवू शकाल. 

कुंभ : स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवी दिशा मिळेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. काहींना गुरूकृपा लाभेल. 

पंचांग 11 डिसेंबर 2019 
बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध 14, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.59, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 5.20, चंद्रास्त पहाटे 5.56, श्रीदत्तात्रेय जयंती, भारतीय सौर मार्गशीर्ष 20, शके 1941. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT