सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 22 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा

दिनमान दि. 22 ऑक्‍टो. 19 
मेष : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. अनेक बाबतीत स्वास्थ्य व समाधान लाभेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. 

वृषभ : तुमच्यातील चिकाटी वाढणार आहे. भावंडांचे सौख्य लाभेल. नातेवाईक भेटतील. 

मिथुन : व्यवसायातील उधारी, उसनवारीची कामे होतील. प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. काहींना गुप्त वार्ता समजतील. 

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. दैनंदिन कामे विनासायास होतील. 

सिंह : विनाकारण खर्च होईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. 

कन्या : प्रियजनांचा सहवास लाभेल. मित्रमैत्रिणींचे व सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. तुमचा उत्साह विशेष असणार आहे. 

तूळ : नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील. 

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना गुरूकृपा लाभेल. 

धनू : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये चूक होण्याची शक्‍यता आहे. मनोबल कायम ठेवावे. 

मकर : जिद्द वाढणार आहे. चिकाटीने कामे मार्गी लावणार आहात. आज तुम्हाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. 

कुंभ : मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. 

मीन : काहींना विविध लाभ होतील. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. धनलाभाची शक्‍यता आहे. 

पंचांग 22 ऑक्‍टोबर 2019 
मंगळवार : आश्‍विन कृष्ण 9, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.33, सूर्यास्त 6.07, चंद्रोदय रात्री 12.17, चंद्रास्त दुपारी 1.54, भारतीय सौर आश्‍विन 30, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT